Videshi Kanya (विदेशी कन्या)
-
Videshi Kanya (विदेशी कन्या)
|
|
Price:
390
|
Front Cover
|
Back Cover
|
|
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी इस्त्राइलमधून जहाजात बसून भारतात आलेले काही बेने इस्त्राईल हे आपले पूर्वज आहेत आणि त्याची मुले कुठपर्यंत खोलवर गेलेली आहेत,हे शोधण्याचा तिचा ध्यास असतो. या ध्यासापोटी ती आपल्या आजीला याचा शोध घेण्याचे आश्वासन देते ते पूर्ण करण्यासाठी ती प्रथम भारतात येते.
तिने ज्यू धर्माच्या लोकांविषयी जे काहीं आजवर ऐकलेले होते, त्याहीपेक्षा ते अधिक वेगळे असल्याचा तिला शोध लागतो. निरनिराळ्या धर्म संस्कृतींचा मिलाफ असलेला एक समान धागा तिला सापडतो आणि हा धागा पकडून ती आपल्या पूर्वजांबद्दल माहिती मिळऊ लागते. त्यातच आपला धर्म नेमका कोणता? आजीचा (ज्यू),आईचा (मुस्लिम) कि वडिलांचा (खिश्चन) अशा विचारचक्रात ती अडकते...