Nal-Damayanti (नल-दमयंती)
-
Nal-Damayanti (नल-दमयंती)
|
|
Price:
135
|
Front Cover
|
Back Cover
|
|
विमनस्कपणाने नल राजा एका उपवनात जाऊन बसला. मन
थाऱ्यावर नव्हते. दमयंतीविषयी कल्पनाविश्वे रचण्यात मन अगदी
मग्न झाले होते. उपवनात जावे, वृक्षवल्ली पाहाव्या, आल्हाददायक
वायुने जरा उलाहासित वाटेल, हंसाचा जलविहार पाहावा असा विचार
करून तो उपवनात गेला व एका वृक्षखाली बसला. तेवढ्यात त्याला
जलप्रवाहाचा बाहेर येउन मौजेने संचार करणारे शुभ्र हंस दिसले.
तेव्हा पटकन त्याने हंस पकडण्याचा प्रयत्न केला. दहा-वीस हंसाचा
थवाच होता तो, नलाची चपळता जरी विलक्षण होती तरी ते पक्षी
निसटलेच. पटापट पाण्यात उतरले व संथ प्रवाहावरून झरझर
सरकत दूर गेले. काही उडाले व दूर जाऊन पुन: माना वळवून पाहू
लागले! पण एक हंस नलाच्या हाती सापडला! त्याला इतकी भीती
वाटत होती! त्याचे हृद्य धपधप करीत होते. नलाच्या हाताना
जाणवत होते. विलक्षण उबदार अशा त्याच्या स्पर्शाने नल हि क्षणभर
स्तिमित झाला होता! तोच तो हंस मनुष्यवाणीने बोलू लागला. "हे
राजा! तू मला मारू नको! मी तुझे इष्ट कार्य करीन. तुला दमयंतीची
ओढ आहे. हे आम्हाला कळलेले आहे.