-
Lay Off (ले ऑफ)
'घराबाहेर पडून आर्थिक शाश्वती मिळवणाऱ्या ह्या स्त्रियांनी जगण्याच्या 'जाण्या वाटा' जरी निवडल्या असल्या तरी त्यांची प्रश्न सुटले नाहीतच. त्यांना काही नवेच भेडसावत आहेत. त्यांना आणि त्या ज्या समाजाच्या अविभाज्य भाग आहेत त्यांनाही. ह्या संग्रहातील ८०% स्त्रिया ह्या इंजिनियर आहेत. हा एक निव्वळ योगायोगच! बाकीच्यांनाही व्यवसाय वेगळा असला तरी काही प्रश्न भेडसावत आहेतच. त्याचा हा कथा स्वरूपात आढावा. नव्या दिशेने निघालेल्या त्या सर्व स्त्रिया आहेत. त्यांच्या समस्याही वेगवेगळ्या आणि नव्याच आहेत.
-
Sthalantar (स्थलांतर)
एखाद कुटुंब हे समाजवीणीतील एक अणु ठरू शकतो नव्हे असतोच अशी अनेक विविध कुटुंब मिळूनच कुठलाही समाज बनत असतो. पुढे पुढे हा प्रवाहाच राष्ट्रीय प्रवाहाला जाऊन मिळतो व राष्ट्रीय… देश बनत असतो. हि परिवर्तनाची प्रक्रिया धीमी असते. पण ती तेवढीच अपिहार्य आणि अटळ आहेच आहे. ह्या परिवर्तन प्रक्रियेत रूढी, परपंरा नीती व मूल्ये तावून सुलाखून निघतात व एका नव्याच पण बदललेल्या स्वरुपात जाणवत असतात.
-
Janma Maranacha Phera(जन्म मरणाचा फेरा )
वृंदा दिवाण यांच्या या संग्रहात नऊ कथा आहेत. या नऊ कथा समाजाच्या वेगवेगळ्या वयोगटांतील आणि स्तरांतील आहे. कौटुंबिक स्वरूपाच्या या कथा वाचनीय अशा आहेत. समस्या मांडायच्या असा आव न आणता, पण कथानकाच्या ओघात यातील समस्या ठळकपणे जाणवतात. स्त्रीची होणारी होरपळ, त्रास वेगवेगळ्या कथांतून जाणवतो, त्याचबरोबर स्त्रीची लढाऊ वृत्ती आणि खंबीरपणाही काही कथांमध्ये दिसतो.