-
Pimpalpan Part -15 (पिंपळपान भाग-१५)
Madhuri Shanbhag/ Vrunda Bhargav/ Suman Phadke/ Mandakini Godse/ Kalpana Bhagwat/ Pravin Davane/ Prakash Pathak/ Rajesh Belhekarआशयसमृद्ध, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श 'मेनका'चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणाऱ्या विलक्षण प्रवाही कथा हे 'मेनका'चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणाऱ्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान...
-
Kavitetalya Shantabai (कवितेतल्या शांताबाई)
शान्ताबाई शेळके यांच्या कविता आणि गीतांच्या सोबतीने केलेली शोधयात्रा आठ दशके वाचकांवर-रसिक मनांवर गारुड करणारे हे नाव ! लोकप्रियता व साहित्य विश्वातील सर्वोच्च सन्मान शान्ताबाई शेळके यांना मिळाले. परंतु कवीचा सर्वात मोठा सन्मान म्हणजे त्याच्या कवितेतून त्याला नव्याने जाणून घेणे. उत्कट जिज्ञासेने कवितेच्या अंतहृदयापर्यंत जाणे. त्याच आदराने कवितेतील शान्ताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाला जाणून घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. शान्ताबाई शेळके यांची बहुआयामी कविता समजून घेणे हाही एक सृजनशील प्रवास आहे. शिणवणारा व समृद्ध करणाराही ! आनंद देणारा नि आर्त करणाराही !
-
Ek Patra Aaicha (एक पत्र आईचं)
जगायचे व लढायचे बळ देणारा मध्यमवर्ग ही माझ्या वैचारिक लेखनाची प्रेरणा आहे. सत्त्वपरीक्षेच्या क्षणी मूल्यसंस्कार निग्रहाने जपणारी आई-वडिलांची पिढी मी अनुभवली आहे. गरिबीतही स्वाभिमानाची श्रीमंती मला आई-वडिलांकडून मिळाली. त्यांच्या कष्टांचे सार्थक करणे हीच ईश्वरपूजा, हे मला संतांच्या साहित्याने शिकवले. श्रेष्ठ साहित्यिक, थोर कलावंतांनी मानवतेचा विचार दिला. अपार कष्टाला पर्याय नाही हे सांगणारे चरित्रग्रंथ नंदादीपाप्रमाणे आयुष्यात आले. माझ्या लेखनामागे आणि जगण्यामागे बळ आहे ते त्या चिरंतन मूल्यश्रद्धांचे ! म्हणूनच 'एक पत्र आईचं!' हे माझे पुस्तक खरे तर 'एक पत्र लेखकाचं!' असंही आहे. हे लेखन आपल्या हाती सोपवताना आपणास होणाऱ्या आनंदातून पत्रोत्तर मला मिळणार आहे! आपला प्रवीण दवणे