-
JRD - Ek Chaturastra Manus (जेआरडी - एक चतुरस्त्र
‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेले पहिले अन् एकमेव उद्योगपती जेआरडी टाटा यांनी उद्योगाचा विकास करताना ‘जे देशाच्या भल्याचे ते टाटांसाठी उत्तमच असेल’ हा विचार प्रधान मानला. नीतीमूल्यांची बूज राखत व्यवहार, उद्योग चालवणारे हात अन् मने जपणे, समाजातून मिळवलेली संपत्ती समाजाच्या विकासासाठी वापरणे, उद्योग उभा असलेल्या परिसराचा विकास ही टाटा उद्योगसमूहाची संस्कृती आहे. नव्याचे स्वागत करत जेआरडींनी अनेकजणांना घडवले, नव्या वाटा खोदल्या, नवे मापदंड निर्मिले. त्यांना लाभलेला उज्ज्वल वारसा, व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, नवे आयाम मिळत विकसित झालेले त्यांचे समृद्ध, चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व याची ओळख या पुस्तकातील लेख करून देतात. विशेषत: अनेकविध भूमिकांना पुरून वर दशांगुळे उरणारा त्यांच्यातील सहृदय, रसिक, संभाषण चतुर, आनंदी ‘माणूस’ वाचकाला अधिक भावतो.
-
Doctors Form Hell (डॉक्टर्स फ्रॉम हेल)
दुसऱ्या महायुद्धात नाझी राजवटीने मानवतेवर केलेले भीषण अत्याचार सांगणारी ही अधिकृत सत्यावर आधारलेली कहाणी आहे. न्यूरेम्बर्ग येथे नाझी डॉक्टरांवर युद्धगुन्ह्यांसाठी जो खटला चालवला गेला त्याचे अमेरिकी लष्करातर्फे वार्तांकन करणाऱ्या स्त्रीने ही डोळ्याने पाहिलेली कहाणी सांगितलेली आहे. शास्त्रीय संशोधन अन् देशभक्ती यांच्या बुरख्याखाली निरपराध व्यक्तींचा छळ आणि खून करण्यात आले. डॉक्टर्स फ्रॉम हेल यामध्ये काही आम जनतेला उपलब्ध नसलेली खटल्याची कागदपत्रेही समाविष्ट केलेली आहेत; तसेच या खटल्यात पुरावा म्हणून सादर झालेले, आजवर प्रकाशात न आलेले फोटोही दिलेले आहेत. यात लेखिकेने बॉम्बने उद्ध्वस्त झालेल्या, धोकादायक असलेल्या युद्धानंतरच्या न्यूरेम्बर्ग शहरात राहतानाचे अनुभव सांगितलेत. खटल्यावर काम करताना तिचे तिथे अठरा महिने वास्तव्य होते. एकदा एका नाझी माथेफिरूने ती राहत असलेल्या हॉटेलवर बॉम्ब टाकला. काही क्षणातच ती तिथे जेवण्यासाठी पोहोचणार होती. या पुस्तकात ती आपल्याला प्रत्यक्ष खटले चालू असलेल्या न्यायालयाच्या सभागृहात नेते, साक्षीदारांनी दिलेले जबाब ऐकवते, बळींच्या प्रतिक्रिया, त्यांचे राग-लोभ आदी भावना शब्दांतून आपल्यापर्यंत पोहोचवते. तिथे नरसंहारातून वाचलेले कैदी आपल्यावर केलेल्या प्रयोगांच्या कहाण्या सांगतात, त्यांना प्राणवायूपासून वंचित केले गेले, बर्फात ठेवले गेले, त्यांना मलेरिया, टायफस, कावीळ आदी रोगांचे जंतू टोचले गेले, त्यांचे निरोगी हातपाय कापले गेले. त्यांना सक्तीने दिवसेंदिवस फक्त समुद्री पाण्यावर ठेवले गेले. असे अनेक अत्याचार केले गेले. या ऐतिहासिक खटल्याची परिणती म्हणून नंतर न्यूरेम्बर्ग कोड लिखितस्वरूपात अस्तित्वात आले. मानवावर वैद्यकीय संशोधन करताना कोणती नीतिमूल्ये पाळावित याची मार्गदर्शक तत्त्वे त्यात ठरवलेली आहेत. ही कादंबरी दुसऱ्या महायुद्धावरील साहित्यात महत्त्वाची भर घालते; तसेच नरसंहार, मानवी हक्क, वैद्यकीय नीतिमूल्ये आणि एकूणच मानव किती पशुत्वाच्या पातळीवर घसरू शकतो याबद्दलही सांगते.
-
A.P.J.Abdul Kalam Ek Vyaktivedh (ए.पी.जे. अब्दुल क
विख्यात अणुशास्त्रज्ञ! भारतीय क्षेपणास्त्रांचे शिल्पकार! भारताचे राष्ट्रपती!
-
Letters To A Young Scientist (लेटर्स टु अ यंग सायं
तरुण मित्र-मैत्रिणींनो , आपल करिअर विज्ञान -संशोधनात करायचं ठरवताय ? कोणते मार्ग अनुसराल ? कोणते आनंद अन निराशा तुमच्या वाटयाला येऊ शकतील ? हे करिअर तुम्ही का निवडायला हवं ? यश मिळवण्यासाठी काय करायला हवं ? ' मुंग्या ' या विषयावर अत्यंत मुलभूत संशोधन करणारे जगद्विखात शास्त्रज्ञ :डॉi इडवर्ड ओ. विल्सन या प्रतिभावना शास्त्रज्ञानंस्वत :च्या जीवनातील घटना , आगळेवेगळे छंद आणि संशोधनातील अनुभव यांच्या आधारे मित्रांच्या जिव्हाळ्यान तरुणीईशी साधलेला संवाद म्हणजे हे पत्ररूप मार्गदर्शन .
-
Brainwaves (ब्रेनवेव्ह्ज)
एक प्रतिभावान शास्त्रज्ञ. त्याने पाहिले एक स्वप्न सर्व विश्वाच्या कल्याणाचे, मानवजातीच्या मंगलाचे, जगातील दुरिताच्या नाशाचे.या स्वप्नपूर्तीसाठी त्याने विज्ञानाची मदत घेतली आणि एक अद्भुत शोध लावला - विचारलहरींवरील नियंत्रणाचा! पण -हा शोध ताब्यात घेतला एका महत्त्वाकांक्षी, स्वार्थी, पाताळयंत्री व्यक्तीने. आणि मग काय घडले? विज्ञानाच्या सामर्थ्याच्या वापराबद्दल विचार करायला प्रवृत्त करणारी कादंबरी.