-
Bhramjal (भ्रमजाल)
आपल्या आईच्या चारित्र्यावर कोणी गरळ ओकावी हे त्याला कधीच सहन झाल नह्व्त. पण सत्यही तो नाकारणार नव्हता. सत्य हे होतं की त्याच्या आईचे अशा पुरुषाशी संबंध आले होते की ज्यांच नाव ती कोणालाच सांगू शकत नह्व्ती. पृथ्वीराज चौहान. अतुल, तुझी आई पृथ्वीराज चौहानच्या प्रेमात पडली होती. आपल्या परींन ही गोष्ट कोणाला कळू नये याची ती खटपट करीत होती. पण ही गोष्ट मी ओळखली होती. अतुलन दोन्ही हातान चेहरा झाकला. छाती खुसमाटावी असा एक हुंदका त्यानं दिला. अखेरीस त्याच्या जन्मदात्या आईनेच त्याला फसवले होते. एक गुन्हेगाराचे रक्त त्याच्या अंगात खेलत होते. वान नाही पण त्याचा गुण त्याच्या रक्तात उतरला होता. अतुलने पनावालेले डोळे टिपले. कोणावर दोषारोप करायची वेळ केव्हाच निघून गेली होती. हा चरचरता व्रण सोबत घेउन त्याला जगावे लागणार होते.
-
Vedh (वेध)
आपण कोण आहोत हे आपल्यालाच तोंडावर काधिकाळी सांगण्यात येईल असं त्याला वाटलं नव्हतं. पण ते नागाडं सत्य होतं. जगातल्या काही मोजक्याच लोकांना ते माहीत होतं. आणि ते लोक याची कुठेही वाच्यता करणार नाहीत याची मला खात्री होती. तरी प्रतापसिंह भनोतना समजलं होतं. कोणाला तरी आपला जीव नकोसा झाला होता. तो कोण?
-
Vishwas (विश्वास)
'झांलं ते चांगलं झांलं सुजा जिथं प्रेम नहीं तिथं संसारही नाही. तो सुखी नक्कीच झाला असता. पण तुझ आयुष्य मात्र दु:खानं झोकाळून गेलं असतं. लग्न झाल्यावर चुकीची दुरुस्ती करता येत नाही. चुक होण्याआधीच तू सावारालीस ते ठींक झाल.' क्षणभर ते थांबले. मग तिच्याकडे एकटक पाहत म्हणाले. 'हा तुझ्या वेदना मला काळातत. पण वेदना सहन करण्याची ताकद परमेश्वरानं त्याला आधीच दिलेली असते. तो त्याची परिक्षाच पहात असतो.