Bendbaja (बेंडबाजा)

By (author) D M Mirasdar Publisher Rasik Aantarbharathi

अडाणीपणा, बेरकीपणा, मूर्खपणा, भोळसरपणा इ. माणसांचे "सदगुण` म्हणजे विनोदी लेखनासाठीचा कच्चा मालच. ग्रामीण आणि नागर दोन्ही भागात हा कच्चा माल भरपूर प्रमाणात असतो. प्रत्येक विनोदी लेखकामागे एक मिश्किल माणूस दडलेला असतो आणि तो हा कच्चा माल बरोब्बर हेरून त्यातली विसंगती खेळकर पद्धतीने शब्दबद्ध करतो. पंढरपूरसारख्या अर्धग्रामीण भागात बालपण घालवलेल्या द..मा. मिरासदारांना असा कच्चा माल भरपूर प्रमाणात गवसला असल्यास नवल नाही. अशा "सदगुणी` माणसांचे वेचक अनुभव ते आपल्या खुमासदार शौलीत कथन करतात. तेहा सामान्यांना अगदी सा­ध्या सु­ध्या वाटणाया"ना सुद्धा मजेशीर परिमाण घेऊन आपल्यासमोर येतात. द.मां.च्या लेखनाचे एक वौशिष्ट्य असे की ते केवळ इतरांच्याच अनुभवाकडे मिश्किल नजरेने पाहतात असे नहे, तर स्वत:चीही फिरकी घेतात. अशा स्वत:च्या घेतलेल्या अनेक फिरक्यांचे हसवणारे सूर या "बेंडबाजा` म­धुन ऐकू येतील.

Book Details

ADD TO BAG