Perfect Reciepies(परफेक्ट रेसिपीज् )

By (author) Pratibha Kothvale Publisher Majestic Prakashan

स्वयंपाक रुचकर करणे ही जशी एक कला आहे. त्याचप्रमाणे तो झटपट व पाहणार्‍याच्या नजरेला आकर्षित करून घेणारा हवा, ही सुद्धा एक कला आहे. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन परफेक्ट रेसिपीज् मधल्या पाककृती लिहिल्या गेल्या आहेत. पुस्तकाच्या सुरुवातीला फळफळावळ, धान्ये, मासे, मटण यांच्या खरेदीविषयी आणि टिकविण्यासंबंधी सांगितले गेले आहे. कोणत्याही पदार्थाची चव तिच्या ताजेपणावर अवलंबून असते, हे लक्षात घेऊन विशेषतः मासे, मटण खरेदीविषयी दिलेल्या सूचना स्वयंपाकात रुची असणार्‍या सर्वांनाच मार्गदर्शन करतील. मसाले, तेल, तूप यांच्या स्वयंपाकातील वापराविषयीच्या सूचनाही महत्त्वाच्या आहेत. डाएटसाठी करावयाचे पदार्थही रुचकर करण्यासाठी दिलेल्या सूचना डाएट करणार्‍या व्यक्तींना दिलासा देतील. व्हेज-नॉनव्हेज स्नॅक्स, भात, पुलाव, चटणी, कोशिंबिरी, भाकरी, परोठे, नान, पुर्‍या, डेझर्टस्, पक्वान्ने, फराळाचे गोड व चमचमीत पदार्थ, बेकिंग, आईस्क्रीम, ज्यूस, मिल्कशेक इत्यादी प्रांतीय व परप्रांतीय शाकाहारी पदार्थांबरोबरच मासे-मटण-चिकन, विशेषतः आजचे लोकप्रिय मालवणी पद्धतीचे मांसाहारी पदार्थ, चायनीज पदार्थ इत्यादी पाककृती या पुस्तकातून दिलेल्या आहेत. या पाककृतींचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येक पाककृती स्वतःबनवून बघितल्यानंतर तिचा परफेक्ट स्वाद जमल्यानंतरच त्या-त्या पदार्थांत वापरलेल्या वस्तूंचे प्रमाण लक्षात घेऊन ती-ती पाककृती लिहून काढली आहे, नव्याने स्वयंपाक शिकू पाहणार्‍या तरुणींनाही पाककृती करणे/शिकणे सोपे जावे म्हणून वाटी-चमच्यांची मापे दिलेली आहेत. स्वयंपाकाविषयीचे हे परफेक्ट पुस्तक सुगृहिणींना तसेच स्वयंपाक शिकणार्‍या सर्वांनाच मोलाचे साहाय्य करेल असा विश्र्वास आहे.

Book Details

ADD TO BAG