Khup Dur Pohochlot Apan (खूप दूर पोहोचलोत आपण)

By (author) Uttam Kamble Publisher Suresh Agency

साहित्यसंमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या या कवितासंग्रहात 37 कविता आहेत. या संग्रहातील पहिलीच कविता "खूप दूर पोहोचलोत आपण' वाचकाला अस्वस्थ करते. देशातील लोकशाहीची वाटचाल आणि ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत, त्यावरचं मार्मिक भाष्य या कवितेत आहे. पहिल्या कवितेपासूनच हा काव्यसंग्रह वाचकाच्या मनाची पकड घेतो. "गाव शोधतं लोकशाही' ही कवितादेखील प्रचलित राजकारणावर जळजळीत भाष्य करते. जागतिकीकरणावर भाष्य करणारी कविता किंवा राबणाऱ्यांच्या कष्टाची जाणीव करून देणारी आणि समाजातील विषमतेवरही प्रहार करणारी "राबणाऱ्यांचा विठ्ठल' हीही कविता अस्वस्थ करून जाते. "ओठ', "मुक्तिगान', "जीव', "शोध', "वेगळा असा उरलोच नाही' या कवितांमधील प्रेमाची भावना आणि त्यातील आशय यामुळे या कविता वेगळ्याच विश्‍वात नेतात.

Book Details

ADD TO BAG