Kimaya( किमया)

By (author) Madhav Aachaval Publisher Mauj Prakashan

किमया ’ ही एक वाटचाल आहे, दैनंदिन जीवनांतील रूक्ष व्यवहारी भूमिकेकडून, सौंदर्याने ‘फुली फुलून’ आलेल्या विश्वाच्या उत्कट व संपन्न जाणीवेकडचा हा प्रवास आहे. लेखक माधव आचवल हे व्यवसायाने आर्किटेक्ट. कलात्मक दृष्टी लाभलेलं, मनात निर्माण होणार्‍या भावनांना तितक्याच अलवारपणे शब्दरुप देणारं संपन्न व्यक्तिमत्त्व! रेती-माती-दगड-विटांमध्ये वावरत असताना त्यातील सौंदर्यामध्ये रमणारा हा लेखक. मनातले भाव आणि ते व्यक्त करणारे शब्द ह्यांचा वापर इतका अचूक आहे की आपल्याला माहिती असलेल्या गोष्टीदेखील नव्या भासतात. ते दृश्य जसंच्या तसं आपल्यासमोर उभं रहातं. ताजमहालाचं पाण्यात ‘डुचमळणारं’ सौंदर्य, आगगाडी अंधार्‍या बोगद्यात शिरून उजेडात बाहेर पडणं... आपणही बोगद्यांतून अनेकवेळा प्रवास केलेला असतो. मग तो बोगदा मुंबई-पुण्याच्या वाटेवरचा असो किंवा जम्मू-श्रीनगर वाटेवरील लांबलचक जवाहर बोगदा असो! लेखकाने केलेल्या वर्णनांतून हे अनुभव नवेच भासू लागतात. ‘किमया’सारख्या पुस्तकांच्या एका वाचनाने कधीच समाधान होत नाही. ती अधून-मधून, पुन:पुन्हा वाचावीशी वाटतात. आपलं रोजचं जगणं अर्थपूर्ण बनवण्यासाठी ते फार आवश्यक असतं.

Book Details

ADD TO BAG