-
Padm Bandh (पद्म बंध)
अंतयामिचा ब्रह्मकमळ सुरेख साक्षात्कार! डोळ्याची दृष्टी झाली कि काळोखाला प्रकाशाचे उत्तर गवसू लागते- आता केवळ बाह्यसोबतीची गरज वाटत नाही. कारण गर्दीत हरवलेल्या आपल्याला सापडलेला असतो. स्वताचा सच्चा सूर! त्या सुराचा सोबतीने बहरलेला ताजे टवटवीत ललित लेखन!
-
DehDhun (देह्धून)
दिवसाचा प्रकाशात न जाणवणारे रात्रीचा गर्भात अधोरेखित होणारे मनाचा पलीकडील असंख्य गुंते अटळ नात्यात मिसळतात. चेहरा आणि मन याच्यातील अंतर, ह्या सबंधाना चकव्यात भोवडत ठेवते. खूप जवळ असूनही दूर असणारी! आयुष्य घुसमटत टाकणारी हि देह्धून. स्त्री-पुरुष नात्याच्या अनेकपदरी लपंडावाचा ह्या कथा कधी भोवतालचा कधी आरशातला!
-
Prashnaparva (प्रश्नपर्व)
प्रश्न माणूस टूटत चलल्याचे प्रश्न अजूनही स्त्री ब्र्हण हत्येचे
-
Thembatl Abhal (थेंबातलं आभाळ)
आजच्या सुखवस्तू जगात, वस्तू सुखी आहेत, आणि माणसं मात्र दु:खी; नेमकं काय चुकतंय? आंनदी असणं आणि आनंदाचा मेकअप यातला फरक माणसं विसरली आहेत का? अविरत परिश्रमाने, आई- बाबांनी जे आयुष्य उभ केलं, त्याची किंमत रेडीमेड चंगळवादी युगातल्या मुलांना केव्हा कळणार आहे? सुखामागे धावता धावता दमून गेलेली आजची घरं कधीतरी अंतर्मुख होणार आहेत की नाही ? संवेदनांना साद घालणारा एक तरल अनुभव - 'थेंबातल आभाळ !"
-
Ekantacha Doh (एकांताचा डोह)
कोलाहातून कधीतरी दूरच्या आतल्या गावात जावसं वाटतं ना ? शहरी गजबजाटातून मनातल्यालाल कौलारु घरात नारळी पोफळीच्या बागेत बिलगणा-या गारव्यात कधीतरी सर्वांच्या नकळत गुणगुणावसं वाटतं न द्या टाळी! अशाच मनाच्या गार सावलतीच असतो तो एकांताचा डोह! तिथे कविता, गाणं, नृत्य, चित्र इतकंच काय ह्या एकांत डोहाकाठीच आपण आपल्याला नव्याने सुचत जातो.