Sambhav-Asambhav (संभाव असंभव)
माणसाच्या आकलनापलीकडे काही अदृश्य, पारलौकिक, अधिभौतिक स्वरूपाच्या शक्ती आहेत, अशी समजूत माणूस बाळगून आहे. देव या संकल्पनेवरची श्रद्धा ही त्यातली सर्वांत आदिम. पण देवाप्रमाणेच माणसाचा आत्मा, साक्षात्काराचे अनुभव, समाधिवस्था, आतला आवाज, मृत्युसमीप व मृत्युपश्चात अनुभव यांवरही लोक विश्वास बाळगून असतात. माणसाच्या या श्रद्धांचा जगभरातले शास्त्रज्ञ गेली कित्येक वर्षं रीतसर अभ्यास करत आहेत. विज्ञानाच्या कसोटीवर माणसाच्या समजुती तपासून पाहत आहेत. या संशोधनाचा आणि त्यातून निघणा-या निष्कर्षांचा धांडोळा.