Aharatun Upchar (आहारातून उपचार)
प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. अंजली मुखर्जी यांच्या Healing with Food या लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. ‘आरोग्य आणि पोषक आहार’ याचे दुसरे नाव म्हणजे डॉ. अंजली मुखर्जी! अन्नामध्ये रोग बरा करण्याची जी अंगभूत ताकद असते, तिचे यथायोग्य सादरीकरण डॉ. अंजली मुखर्जी यांनी या पुस्तकातून केले आहे. आधुनिक जीवनपद्धती आणि त्यातले ताणतणाव यामुळे जास्तीत जास्त लोक निरनिराळ्या व्याधींनी त्रस्त झालेले दिसतात. त्यातूनही हृदयरोग, मधुमेह आणि कॅन्सर हे सर्वाधिक मृत्यू होण्यास कारणीभूत ठरणारे तीन रोग आधुनिक जीवनशैली व खानपान यांचे परिणाम आहेत. त्यामुळेच योग्य खाण्या-पिण्याच्या सवयी रोगप्रतिबंधक असतात, याचाच पुरस्कार करणार्या डॉ. अंजली मुखर्जी यांनी आहारातून उपचार या पुस्तकातून रोग बरा करण्याचे साधनही अन्नच आहे हे सिद्ध केले आहे.