Ganiti (गणिती)

गणित या विषयाची भीती घालवून त्याची गोडी वाढवणारं, गणिताची मूलतत्त्वं आणि इतिहास अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजावून सांगणारं हे पुस्तक आहे. या पुस्तकात प्राचीन संस्कृतीपासून गणिताचा वापर कसा सुरू झाला हे तर आहेच, पण त्याचबरोबर आर्यभट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, पायथागोरस, युक्लिड, आर्किमिडीज, न्यूटन, गाऊस, रीमान, ऑयलर, रामानुजन यांच्यासारखे अनेक महान गणितज्ञ येथे भेटतील. या सगळ्यांच्या संघर्षाबद्दल, त्यांच्यातल्या वादविवादांबद्दल, चढाओढीबद्दल आणि आशा-निराशेबद्दल हे पुस्तक एक अनोखं भावविश्‍व उभं करतं. एवढंच नाही, तर अंकगणित, भूमिती, बीजगणित, कॅल्क्युलस, ग्राफ थिअरी, वक्र स्पेस, टोपॉलॉजी, चौथी मिती, नॉन-युक्लिडियन जॉमेट्री, सेट थिअरी, ग्रुप थिअरी, मॅट्रिक्स, तर्कशास्त्र, संभाव्यताशास्त्र, शून्य आणि अनंत अशा अनेक कल्पना हे पुस्तक सोप्या भाषेत समजावूनही सांगतं. गणिताची इनसाईट मिळवून देऊन त्याविषयी नवीन वाचण्यासाठी उद्युक्त करणारं ‘गणिती’ कुठल्याही शाखेच्या प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, पालक, गृहिणी आणि व्यावसायिक या सगळ्यांनी जरूर वाचायलाच हवं.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category