Kalachakra (कालचक्र)

By (author) Arun Tikekar Publisher Rohan Prakashan

गाढे अभ्यासक, संशोधक, संपादक-लेखक आणि ग्रंथप्रेमी असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. अरुण टिकेकर यांचे समाजमानसात घडत असलेल्या बदलांकडे, वृत्ती-प्रवृत्तींकडे किती बारीक लक्ष होते, याची साक्ष हा लेखसंग्रह वाचताना पटते. सदरलेखनाच्या निमित्ताने केलेल्या स्फुटलेखांमधून डॉ. टिकेकर सामाजिक-राजकीय विषयांवर मार्मिक भाष्य करतात. तसंच मर्मज्ञ रसिकतेने जुन्या मौलिक ग्रंथांची ओळख करून देतात. कधी साहित्य, क्रीडा आणि कला-संस्कृती अशा विविध क्षेत्रांतील तत्कालीन घटना-प्रसंगांवर उपरोधिक शैलीत भाष्य करतात. एखाद्या ज्येष्ठ आणि अभ्यासू मित्राने सहज गप्पा माराव्यात, आपल्याला उमजलेलं काहीतरी सांगावं अशी या लेखांची ओघवती शैली आहे. हे लेख विचारप्रवृत्त करतात, क्षणाक्षणाला वेगाने फिरत राहणार्‍या 'कालचक्रा'चं भान देतात!

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category