Reshimgathi ( रेशीमगाठी)

’नाथ हा माझा’ या चरित्रग्रंथामुळे कांचन घाणेकर यांची ओळख अवघ्या महाराष्ट्राला झाली. सुलोचनादीदींमुळे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांचा सहवास त्यांना लहानपणापासून लाभला. त्यामध्ये भालजी पेंढारकर, राजा परांजपे, चंद्रकांत, माई मंगेशकर, लता मंगेशकर अशा दिग्गज व्यक्तींचा समावेश होता. अशा सतरा दिग्गजांची भावचित्रं घाणेकर यांनी ’रेशीमगाठी’ या व्यक्तिचित्र संग्रहातून रेखाटली आहेत. त्या व्यक्तींशी कांचनजींचे जुळलेले भावबंध या संग्रहातून अधोरेखित होतात. सुलोचनाजी आणि काशिनाथ घाणेकर या त्यांच्या अत्यंत निकटच्या व्यक्तींंचं भावचित्रही त्यांनी रेखाटलं आहे. या संग्रहातून कांचनजींच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलूही उलगडत जातात. शिवाय या व्यक्तींशी त्यांच्या आणि सुलोचनाजींच्या असलेल्या भावबंधाचं हृद्य दर्शन घडतं. या दिग्गजांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल न बोलता त्यांच्या सहवासातील भावक्षणांचं स्मरण कांचनजींनी या संग्रहातून केलेलं आहे. ते स्मरण त्यांच्या ओघवत्या भाषेत वाचणं हा एक अविस्मरणीय अनुभव ठरावा. तेव्हा या अविस्मरणीय अनुभवासाठी ’रेशीमगाठी’ अवश्य वाचलं पाहिजे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category