Berlin Gangela Milale (बर्लिन गंगेला मिळाले)
जर्मनीतील हैडेलबर्ग या हिंदू धर्माचा प्रभाव असलेल्या शहरातील म्यूलर कुटुंबाची ही कथा. मानफ्रेड म्यूलर आणि त्यांचा मुलगा फ्रान्झ म्यूलर हैडेलबर्ग विद्यापीठात भारतीय संस्कृतीचे प्राध्यापक असतात आणि हिंदू धर्माचे चाहतेही. एर्ना ही फ्रान्झची पत्नी. तिला मात्र हिंदू धर्माविषयी चीड असते. मानफ्रेड यांच्या मृत्यूनंतर फ्रान्झ भारतात जाऊन संन्यास घेतो. तिथेच राहतो. एर्ना-फ्रान्झचा मुलगा अल्बर्ट. त्याला मात्र हिंदू धर्मापासून दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न एर्ना करत असते. त्यात ती बऱ्यापैकी यशस्वीही होते; पण फ्रान्झच्या भारतातील मित्राची मुलगी भारती जर्मनीला शिक्षणासाठी येते आणि म्यूलर कुटुंबात राहायला लागते. तिच्यात आणि अल्बर्टमध्ये प्रेमांकुर फुटतो , त्यांच्या जवळिकीतून भारतीला दिवस जातात. दरम्यान, फ्रान्झचा मृत्यू होतो. भारतीमुळे अल्बर्टही हिंदू धर्माकडे आकर्षित होतो; पण एर्नाच्या भीतीने भारतातील नोकरी नाकारतो. भारती आणि अल्बर्टला प्रश्न पडतो की, एर्नाला आपल्या प्रेमाविषयी, भारतीच्या गरोदरपणाविषयी कसं सांगावं. कसा सुटतो हा तिढा?