Rajarshi Shahu Chatrapati Ani Samajik Nyay (राजर्ष

‘राजर्षी शाहू छत्रपती आणि सामाजिक न्याय’ या छोटेखानी पुस्तकातून आपल्याला राष्ट्रपुरुष छत्रपती शाहू महाराजांचे समाजक्रांतीचे कार्य व दीन-दलित-पतितांविषयीची तळमळ दिसून येते.सामाजिक न्याय,सत्यशोधक चळवळ,संगीतसूर्य केशवराव भोसलेंचे कलेसाठीचे कष्ट,शाहू छत्रपती व पॅलेस थिएटर,प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग मधील बहुजन समाजातील विद्याथ्र्यांचे जीवन,शाहूपंचसूत्री आजही देशाला मार्गदर्शक ठरते.या सर्व अकरा लेखांतून छत्रपती शाहूंचे कौटुंबिक,सामाजिक,शैक्षणिकविचार व द्रष्टेपण दिसते. कलेविषयीची आस्था,जाण, केशवराव भोसले या अभिजात कलावंताविषयीचे प्रेम-जिव्हाळा,‘ललित कलादर्श’ची निर्मिती,याचे शाहूराजेंना कौतुक होते. म्हणूनच बालगंधर्व,केशवराव या दिग्गजांचे संगीतनाट्याचे प्रयोग कोल्हापुरातील सामान्य जनतेलाही पाहायला मिळावेत,म्हणून त्यांनी ‘पॅलेस थिएटर’ची निर्मिती केली.मराठी नाटकातील ‘मखमली पडदा’ ही केशवरावांची महाराष्ट्राला मिळालेली कलात्मक देणगी.बदलत्या परिस्थितीत सामाजिक-सांस्कृतिक न्याय,स्त्रीजातीचा कैवार यांविषयी आवाज उठवून शाहूराजेंनी अन्यायाविरोधात कायदे केले.आंतरजातीय विवाह हा शाहूराजांनी स्वत:च्या बहिणीस होळकर कुटुंबाला देऊन जातीभेद नाहीसा केला.विधवा पुनर्विवाह,घटस्फोट वारसा हक्क,देवदासी प्रतिबंध कायदा,स्त्रीला क्रूर वागणूक दिल्यास प्रतिबंध, या कायद्यांची अंमलबजावणी केली.बाराव्या शतकातील बसवेश्वर महाराज हे गौतम बुद्धांचे वारसदार,तर शाहू महाराज हे बुद्ध व बसवेश्वर या दोहोंचे वारसदार बनले.बहुजन समाजाचे वाली महात्मा पुÂले यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ लिहला.सत्यशोधक समाजाची स्थापना केली.हे सत्याचे प्रयोग शाहूराजांनी राबवले.मुला-मुलींना शिक्षणवाट मोकळी केली.देशातील धर्मांधतेचा धोका ओळखला. जातिद्वेष,वर्णद्वेष,धर्मद्वेष,प्रांतद्वेष अशा अनेक समस्यांनी आजही भारताला घेरलंय. राजकारण, सत्ताकारण व स्वार्थाला थारा न देता, शाहू-पुÂले-आंबेडकर या राष्ट्रपुरुषांचे विचार नवभारताला प्रेरणादायी ठरणारे आहेत.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category