Shakuni (शकुनी)

By (author) Jayant Jogalekar Publisher Hedwig Media House

महाभारतात अनेक खलनायक आहेत. धीवरराज यशराज, कंस, जयद्रथ, दुर्योधन पण या सर्वांना झाकोळून टाकणारा खलनायक म्हणजे शकुनी. गांधारीचा भाऊ. दुर्योधनाचा मामा - महाभारत घडले ते याच्यामुळेच. जनमानसात आज शकुनीची जी प्रतिमा आहे ती सर्वथ: टेलिव्हिजनवर सादर झालेल्या महाभारतावर बेतलेली आहे. क्रूर, खुनशी, लंगडा अशी. पण खरा शकुनी असा नव्हता. शकुनी गांधार देशाचा युवराज होता. मुरलेला राजकारणी होता. धुरंधर योद्धा होता. भारतीय युद्धात त्याने पांडवांचे अनेक सेनापती ठार केले होते. तो कौरवांचा रणनीतिकार होता. तो गूढविद्येत प्रवीण होता. शेवटच्या दिवशी त्याने दुर्योधनाला प्राण वाचवायचा सल्ला देऊन रणभूमीवरून बाहेर पाठवले. पण तो स्वत: शेवटपर्यंत प्राणपणाने झुंजला. त्याने वीरमरण स्वीकारले.­ कोणीही मूळचा खलनायक नसतो. काही कारणांमुळे तो खलनायक बनतो. मग शकुनी खलनायक कसा झाला ? त्यामागची कारणे काय होती ? या सर्वांचा शोध घेणारी, शकुनीचा राजकुमार ते खलनायक हा प्रवास दाखवणारी कादंबरी...

Book Details

ADD TO BAG