-
Daityaraj Auto Shankar Ani Itar Katha (दैत्यराज ऑट
रानटी अवस्थेत राहणारा माणूस सुसंस्कृत होण्यासाठी हजारो वर्षं लागली, पण माणूस खरंच सुसंस्कृत झाला का? मानवी इतिहासातली अनंत युद्धं आणि त्यात गेलेले लक्षावधी बळी काहीतरी वेगळंच सांगतात. चेहऱ्यावरचे मुखवटे उतरतात आणि त्यामागची हिंसक वृत्ती सतत दिसत राहते. जगभरात घडणारे गुन्हे माणसांतली श्वापदं जिवंत असल्याचे दाखले रोज देतात. गुन्ह्यांच्या या कथा मानवी मनातल्या हिंसक भावनांचं ‘कॅथार्सिस’ आहेत. हा ‘कॅथार्सिस’ अधिक गतिमान आणि प्रबळ करणाऱ्या थरारक कथा कल्पिता राजोपाध्ये यांच्या धारदार लेखणीतून...
-
Deshodeshichi Khadyasanskriti (देशोदेशींची खाद्यसं
आज जग जवळ आलंय. त्यामुळे भाषा, संस्कृती यांची जशी देवाण-घेवाण होते, तशीच खाद्यसंस्कृतीचीही होते. प्रत्येक ठिकाणची खाद्यसंस्कृती त्या त्या ठिकाणचं हवामान, तिथली पिकं, समुद्रसान्निध्य, डोंगराळ प्रदेश अशा अनेक भौगोलिक गोष्टींवर अवलंबून असते. प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या भागांत ती वेगवेगळी असू शकते आणि ती बदलत राहते. अशा प्रकारची देवाण-घेवाण वर्षानुवर्षं होत आलेली आहे. तरीही काही परंपरागत पाककृती तशाच राहतात. इतकंच काय, पण बाहेरून आलेल्या पाककृती, तिथल्या स्थानिक चवीप्रमाणे आणि पद्धतीनुसार बदलतात आणि रूढ होतात. जगाच्या कानाकोपर्यातल्या अशाच विविध खाद्यपदार्थांचा खजिना म्हणजे वसुंधरा पर्वते यांचं ‘देशोदेशींची खाद्यसंस्कृती’ हे पुस्तक. प्रत्येक गृहिणीच्या संग्रही असायलाच हवं.
-
Vikalpa (विकल्प)
‘विकल्प’ या डॉ. अनघा केसकर यांच्या नव्या कथासंग्रहात विविध विषयांवरच्या नऊ कथा आहेत. हा ताजा कथासंग्रह त्यांच्या पूर्वीच्या कथांप्रमाणेच मानवी मनाच्या विविध छटा त्यांच्यातल्या बारीकसारीक कंगोर्यांसकट वाचकांसमोर ठेवतोे. आपल्याच आसपास वावरणारी, आपल्यासारखेच छोटे-मोठे प्रश्न नि समस्या हाताळणारी सामान्य माणसं वाचकाला या कथांमधून भेटतील. आणि म्हणूनच स्वतःच्या अनुभवविश्वाशी कथांतल्या व्यक्तिरेखांचं आणि घटनांचं साधर्म्य शोधण्याचा वाचक अजाणता प्रयत्न करतील. आयुष्याविषयी मुळातून विचार करायला उद्युक्त होतील.
-
Chandrabudhicha Blog (चंद्राबुडीचा ब्लॉग)
कथांचा घाट आणि विषय़ यांचे मोठया प्रमाणात नागरीकरण झालेलं आहे. पण कथांची बीजं छोट्या गावातही असतात. त्यातून विनोदी अंगानी जाणाऱ्या गावातल्या कथा लिहिण्यासाठी केवळ निरीक्षण आणि भाषाशैली पुरेशी नसते; ती भाषा जगलेली असावी लागते. अस्सल वऱ्हाडी भाषा जगणारे आणि ती समर्थपणे उतरवणारे लेखक ही ओळख अशोक मानकरांनी कमावलेली आहे. या कथा लिहिताना ग्रामीण भागावर नव्या तंत्रज्ञानाचा झालेला परिणाम, त्याचं चित्रण करण्यात मानकरांचा हातखंडा आहे. वऱ्हाडी ठेचा आवडणाऱ्यांना आणि त्याची चव न चाखलेल्यांनाही हा कथासंग्रह सारखाच आनंद देईल.
-
Pimpalpan Part 12 (पिंपळपान भाग -१२)
आशयसमृद्घ, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श ‘मेनका’चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणार्या विलक्षण प्रवाही कथा हे ‘मेनका’चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान...
-
Pimpalpan Part 11 (पिंपळपान भाग -११)
आशयसमृद्घ, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श ‘मेनका’चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणार्या विलक्षण प्रवाही कथा हे ‘मेनका’चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान