-
Unbroken (अनब्रोकन)
संदर्भातल्या ठळक बातम्या तुम्ही बाचल्या आहेत, अफवा ऐकल्या आहेत. या साऱ्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या श्रीकडून आता ही कथा ऐका. दि. २५ ऑगस्ट २०१५. इंद्राणी मुखर्जीसाठी आनंदाचा दिवस होता. घरात वाढदिवसाची जय्यत तयारी झाली होती. त्या दिवशी 'आनंद आश्रम' इथून त्या बाहेर पडल्या, तेव्हा मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या साध्या कपड्यांतल्या एका समूहाने त्यांना हटकलं आणि सारं चित्र बदललं. त्यांची मुलगी शीना बोरा हिच्या खुनाचा त्यांच्यावर आरोप होता. बातमी पसरून त्याबद्दलची अधिकाधिक माहिती उपलब्ध होऊ लागली. एका खळबळजनक खून खटल्याच्या तपासात इंद्राणी अडकल्या. संशयितांची यादी झपाट्याने वाढू लागली. एका भयंकर कारस्थानाची ती सुरुवात होती. बातमी सनसनाटी ठरणार होती प्रसारमाध्यमांना रक्ताचा वास आला होता. पाहता पाहता पत्रकार आणि टी. व्ही. अँकर यांच्या निष्ठठुर पकडीत इंद्राणी आल्या. त्यांचं नाव घराघरांत पोहोचलं. पोटच्या पोरीला ठार केल्याचा आरोप, मोडलेले विवाह, शक्तिशाली व्यावसायिक साम्राज्य, श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींचं हेवा करावंसं वाटणारं आयुष्य, सामर्थ्यशाली राजकारणी आणि गुंतागुंतीचं कुटुंब - सारंच होतं. खटला सुरू झाला. त्या संदर्भातल्या बातम्या आणि फोटो टी. व्ही. च्या पडद्यावरून देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले. उलटसुलट बातम्यांच्या आणि चक्रावून टाकणाऱ्या कथेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या या स्त्रीबद्दल लोकांचं कुतूहल दिवसागणिक वाढू लागलं. 'अनब्रोकन' या स्मृतिप्रवासात इंद्राणीने हातचं काहीही राखलं नाही. त्यांचं बालपण गुवाहाटी इथे गेलं, १९९०च्या दशकात त्या कोलकात्यात राहिल्या. पुढे स्वप्ननगरी मुंबईत मीडियाने त्यांना उच्चासनावर बसवलं. त्यानंतर भायखळाच्या तुरुंगात 'कैदी नंबर १४६८' म्हणून त्यांनी २४६० दिवस व्यतीत केले. त्यांचा हा संपूर्ण प्रवास त्यांच्याच शब्दांत, अगदी पहिल्यांदा समोर येत आहे. अत्यंत प्रामाणिकपणे कथन केलेल्या या स्मृतिप्रवासात इंद्राणी मानवी नातेसंबंधांच्या नाजूकपणाबद्दल, फसवणूक आणि शोक यांमुळे वाट्याला येणाऱ्या उद्ध्वस्त झालेल्या जीवनाबद्दल आणि माणसाच्या एकंदरीत काटक लवचीकतेबद्दल बोलतात. इतकं सारं घडूनही त्यांच्यातली स्त्री आजही मोडून पडलेली नाही, आजही ती आहे अभंग अनब्रोकन !
-
Bharat Viruddha Cheen Maitri Shakya Ka Nahi (भारत विरूद्ध चीन - मैत्री का शक्य नाही?)
भारत आणि चीन या दोन देशांतील संबंधांचा सखोल आणि समग्र वेध घेणारे, सर्वांत महत्त्वाचे पुस्तक आहे. ◆ “भारत विरुद्ध चीन” हे पुस्तक खरोखरच उत्तम आहे. यात कांती बाजपेयी यांनी भारत-चीन संबंधांचा इतिहास, राजकीय व लष्करी घडामोडी आणि दोन्ही देशांमधील संबंध कसे बदलत गेले याचं स्पष्ट आणि सोप्या भाषेत विवेचन केलं आहे. एखाद्या गंभीर विषयावर सखोल अभ्यास करून तो सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर हे पुस्तक त्याचं उत्तम उदाहरण आहे. - रामचंद्र गुहा ◆ दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव वाढलेला असताना हे उपयुक्त पुस्तक अत्यंत योग्य वेळी आलेलं आहे. धोरणकर्ते आणि चीनबाबत अभ्यास करणाऱ्यांनी नक्की वाचावं असं हे पुस्तक आहे. - शशी थरूर
-
Swapnashilp (स्वप्नशिल्प)
कामिनी मंदिर संपूर्ण जगात प्रसिद्धीस पावले. जगभरातील शिल्पकारांनी आणि रसिकांनी आचार्य अश्विनीकुमारांच्या कलेची प्रशंसा केली. मात्र कामिनीशिल्प वस्त्राच्छादित होते, त्यामुळे अनेकांची निराशा झाली. कामिनी कुरूप होती, असाही एक समज पसरला. अनेक शिल्पकारांनी कामिनी शिल्पाचे काम पूर्ण करण्याची तयारी दर्शवली, पण कुणालाही ते पूर्ण करणे जमले नाही. अनेकांनी तसा प्रयत्न केला असता त्यांची त्वचा भाजून निघाली. त्या शिल्पाची प्रसिद्धी झाली, ती याच कारणास्तव ! जवळपास दोन तपे निघून गेली. महाराज विक्रमादित्य द्वितीय आता वृद्धत्वाकडे झुकू लागले. त्यांना अजूनही त्या शिल्पकाराची प्रतीक्षा होती, जो कामिनीला पूर्णरूप देणार होता. कोण होती ही कामिनी ? काय होती कामिनी मंदिरामागची कथा ? काय आहे कामिनीशिल्पाचे रहस्य ?
-
Bipin Ganaveshamagacha Manus (बिपिन गणवेशामागचा माणूस)
साधारण १९७८ चा काळ. भारतीय लष्करी अकादमीमध्ये एक किरकोळ शरीरयष्टीचा आणि मध्यम उंचीच्या 'जंटलमन कॅडेट' कडे याआधी फारसं कुणाचं लक्ष नव्हतं. याच छात्राची त्याच्यापेक्षा सर्वार्थानं बलाढ्य म्हणता येईल, अशा कॅडेटनं बॉक्सिंगमध्ये निदर्यतेनं 'पिटाई' केली. त्यामुळं या किरकोळ कॅडेटच्या नाका-तोंडातून अक्षरशः रक्त यायला लागलं. आता तरी तो माघार घेईल, असं सामना पाहणाऱ्या सर्वांनाच वाटत होतं. परंतु हार मानण्याची मानसिकताच नसलेल्या त्या किरकोळ कॅडेटनं अवघा सामनाच पलटवून टाकला आणि अखेरीस विजय मिळवला. आता प्रेक्षकांना उत्सुकता होती, हा मुलगा आहे तरी कोण हे जाणून घेण्याची! तो होता झोजिला कंपनीचा आणि मितभाषी 'जंटलमन कॅडेट' बिपिन रावत ! भविष्यात लाजाळू तोच भारताचा पहिला सरसेनाध्यक्ष बनला ! ही आहे त्या पहिल्या सरसेनाध्यक्षांची कथा !!
-
Yuktahaar (युक्ताहार)
या पुस्तकामध्ये मुनमुन दहा आठवड्यांचा, सहज पाळता येण्यासारखा एक कार्यक्रम आपल्याला आखून देते. ती आपल्याला आपल्या आतड्यांचं आरोग्य सुयोग्य राखण्यास मदत करते. ज्यासाठी ती ऋतुमानाप्रमाणे अन्नाचं नियोजन, पाककृती, व्यायामाचे नियमन, झोपण्याच्या सवयी आणि योग करणे याचं पालन करायला सांगते. या पुस्तकामध्ये, मुनमुनसोबत काम करून, अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्यात आमूलाग्र बदल कसा झाला या विषयीही सांगितलं आहे. यात ती भर द्यायला सांगते ते पारंपरिक, प्रादेशिक पाककृतींवर. त्यासोबत ती पुरावा देऊन काही सूचनाही करते. 'युक्ताहार' तुमचं अन्नासोबतचं नातं घडवतं आणि त्यातूनच तुमच्या आतड्याचं आरोग्य सुधारतं. ते अधिक सुयोग्य (Lean) आणि सुदृढ बनतं....