-
Me Bharatala Mahasatt Karnarch ! (मी भारताला महासत
आपल्यातील सुप्तपणे दडलेला विजेता ह्या पुस्तकातील विचारांनी जागृत होईल आणि जिद्धीने, आत्म विश्वासाने, उत्साहाने स्वतःचे अंत:करण प्रज्वलित करून भारताला महासत्ता करण्याच्या प्रवासात मार्गस्थ होईल कारण हजारो मैलांचा प्रवास आपल्या पहिल्या पावलाने सुरु होतो. चला तर एकमुखाने बोलूया मी भारताला महासत्ता करणारच! भारत महासत्ता होणारच!
-
Bridging The Gap (ब्रिजिंग द गॅप )
वयात येणारी मुल - मुली म्हणजे घराघरात धुमशान! अभ्यास, खेळ, टीव्ही, मित्र - मैत्रिणी या कळीच्या मुद्यावर मुलाशी संवाद साधताना तुमच्याही घरी 'रातदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' अशी परिस्तिथी निर्माण होते का ? पर अभी टेन्शन नही लेने का …. क्या बोला? मुलांशी मनमोकळा संवाद साधला, त्यांच्याशी बोलताना चांगले शब्द, अचूक वेळी, योग्य प्रकारे वापरले तर तुमच्याही घरातील विसंवाद सुसंवादात बदलू शकतो. पालक - मुलांच्या नात्यात निर्माण होणारा हा विसंवादाचा दुरावा प्रभावी सवांदाने कसा भरावा ते सांगताहेत डॉ. राजेंद्र बर्वे, हलक्या - फुलक्या शैलीत आणि तेही अर्कचित्रांच्या आधारे!
-
Aflatoon Avliyae (अफलातून अवलिये )
द्वारकानाथ संझगिरी यांना आयुष्यातील विविध टप्प्यांवर काही सुप्रसिद्ध तर काही अपरिचित असे अविलीये भेटले आणि त्यांची अफलातून व्यक्तिमत्वं संझगिरींच्या मन:पटलावर कोरली गेली ती कायमचीच! या अफलातून अवलियांची ही लोभसवाणी व्यक्तिचित्रं.
-
Hawai Mulukhgiri (हवाई मुलूखगिरी)
अभिनेता असूनही गडकिल्ल्यांच्या निसर्ग वाटा पायी तुडवणारे मिलिंद गुणाजी आणि त्याचे जिवलग मित्र असलेले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या मैत्रीतून साकारलेलं हे पुस्तक. हवाई छायाचित्रणाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या एतिहसुच ठेव्याच्या 'याचि देही यचि डोळा' घेतलेल्या अदभूत दर्शनाचं हे सचित्र कथन. या हवाई मुलुखगिरीत कधी भोगोलिक ऐतिहासिक ज्ञानाची कसोटी लागलेली दिसते, तर कधी त्यातील मजेशीर प्रसंग हसवून लोटपोट करतात, कधी जीववरं बेतलेलं सहस निश:ब्द करतं तर कधी निसर्गच एक सुंदर काव्यरूप धरण करून समोर आलेला दिसतो! एक कवी मनाचा, संवेदनशील लेखक आणि प्रतिभावंत छायाचित्रकार यांच्या संयुक्त आविष्कारातून साकारलेली हि नितांत सुंदर, विहंगम अशी हवाई मुलूखगिरी!
-
Khawayanche Adae (खवय्यांचे अड्डे)
कुठेही भटकंतीला गेलं की रसिक खवय्ये मागे काढतात तो तिथल्या खाद्यपदार्थांच्या अडड्यांचा स्वाद. चाखू पाहतात तो तिथल्या खाद्यवैशिष्टयांचा, तिथल्या चवींचा! तुम्हीही तेच करता? मग खास हे तुमच्यासाठी हे पुस्तक... सगळ्या प्रांतातील खाऊच्या अड्ड्यांची माहिती देणारं! भटकंतीला जाताना बरोबर न्यावं असं … संग्राह्य!
-
Akshay Gaane (अक्षय गाणे)
स्वरसम्राज्ञीने आपल्या खास मैत्रिणीकड़े उलगडलेले अंतरंग आणि तिचा सांगीतिक प्रवास टिपणारे एक संग्राह्य पुस्तक!
-
Durgvarasa (दुर्गवारसा)
जेष्ठ गिर्यारोहक मिलिंद आमड़ेकर यांनी महाराष्ट्रातील १५० व त्या व्यतिरिक्त देशातील ८० किल्ले पाहिले आहेत एवढच नव्हे, तर अभ्यासले आहेत. भारताच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या त्या प्रत्येक दुर्गाला आपला एक स्वतंत्र इतिहास आहे. हे दुर्ग इथल्या पर्यटन विभागाचे अविभाज्य अंग झाले आहे. आपल्या देशाचा हा दुर्गवारसा प्रत्येकाने समजून घ्यावा तो पुढे जोपासला जावा म्हणून हा पुस्तक प्रपंच..
-
Aai Orkut Ani Metkut (आई ऑर्कुट आणि मेतकूट)
बायका आणि विनोदाचा एक अनोखा पैलू...
-
Kshitij Jase Disate (क्षितिज जसे दिसते...)
संगीतकार- कवी-गायक श्री. कौशल इनामदार यांच्या संगीताइतक्याच समर्थ लेखणीचा अविष्कार.
-
Ra.Dho.Karve (र.धों.कर्वे )
विसाव्या शतकाच्या शुभारंभाच्या वर्षात (१९०१) रघुनाथ धोंडो कर्वे नावाच्या अवघ्या एकोणीस वर्षाचा तरुण, संततिनियमनविषयक मते मांडतो, त्याचं महत्व ओळखतो, ही गोष्टच इतकी महत्वाची आहे, की एकविसाव्या शतकातला आपल्या देशातल्या लोकसंख्येचा विस्फोट पाहता, या दृष्ट्या माणसाने संततिनियमनाचे महत्व शंभर वर्ष आधी ओळखले होते; याचा विस्मय वाटतो. प्रो. रघुनाथ धोंडो कर्वे यांचे हे कार्य आज कालबाह्य वाटण्यासारखे तर नाहीच; उलट आजच्या विज्ञानप्रगत काळातही त्याचे महत्व जास्तच अधोरेखित होते.