-
Janma Maranacha Phera(जन्म मरणाचा फेरा )
वृंदा दिवाण यांच्या या संग्रहात नऊ कथा आहेत. या नऊ कथा समाजाच्या वेगवेगळ्या वयोगटांतील आणि स्तरांतील आहे. कौटुंबिक स्वरूपाच्या या कथा वाचनीय अशा आहेत. समस्या मांडायच्या असा आव न आणता, पण कथानकाच्या ओघात यातील समस्या ठळकपणे जाणवतात. स्त्रीची होणारी होरपळ, त्रास वेगवेगळ्या कथांतून जाणवतो, त्याचबरोबर स्त्रीची लढाऊ वृत्ती आणि खंबीरपणाही काही कथांमध्ये दिसतो.