-
...Ho Kinai ?(…हो किनई ?)
सहज-सोपे-हळुवार-बोलके सवांद, मिश्किल विनोदबुद्धी, चाणाक्ष निरीक्षणशक्ती आणि थोडासा खटयाळपणा देखील … या सर्वांचा समन्वय 'हो किनई ?' या कथासंग्रहात इतक्या सहजपणे घडून आलाय की लेखिकेच्या लेखणीने तिच्याच हातून चितारलेल्या कुंचल्याला प्रश्न करावा किंवा कुंचल्याने लेखणीला सवाल करावा - वाचकाला "कोण आवडणार तू का मी ?" वाचक म्हणतील "दोन्ही!!!" … 'हो किनई ?'