-
Raktarekha (रक्तरेखा)
'पुन:प्रहार' ! सोलापूरच्या,कानडी ढंगाने मराठी भाषा बोलणाऱ्या शशी भागवताने 'मराठी विषयी घेऊन कसाबसा मुंबईच्या विल्सन कॉलेजात प्रवेश मिळवला... आणि आठ दिवसात प्रा. बा. ल. कुलकर्ण्यांनी त्याला 'मराठी'च्या बाहेरची वाट दाखवली. माझे 'मराठी'चांगले नसावे. कदाचित मुलीच्या देखत झालेला तो मानभंग मला बोचला आणि मला लेखक करून गेला,पण नाही! मी लहानपणी शाळेतही काहीबाही लिहित होतोच!पण तरीही हे तेवढ्यामुळेच घडले असावे,असेही नाही... त्याला अगम्य,अर्तक्य असे काही वेगळेच कारण असावे-मागील जन्मी माझे हे अपूर्ण राहिलेले 'कर्म'ही असण्याचा संभाव आहे. म्हणजे हा पुनर्जन्म...? होय,पुनर्जन्मावर निदान माझा तरी विश्वास आहे... त्या शिवाय 'कर्म'ह्या गोष्टीला काही अर्थच नाही. आज ह्या गोष्टीला काही अर्थच नाही. आज ह्या 'रक्तारेखे'ला साक्षी ठेऊन 'मी' संकल्प सोडतो आहे... मी आज लिहिणार आहे,ते पुनर्जन्मावर...! 'पुन:प्रहार' ! ज्याच्या त्याच्या कर्मा'चा ! गतजन्मीच्या 'कर्मा'चा ! कारण कर्मा'वाचून खरे असे काहीच नाही...!
-
Ratna-Pratima
रत्न- प्रतिमेचे गुंतागुंतीचे अनेक पदरी महावस्त्र श्री. भागवतांनी मोठ्या हुशारीने विणले आहे. या कथानकाला प्राचीन काळाची डूब देण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले आहेत. आजच्या भाषासरणीशी अपरिचित अशा अनेक संस्कृत शब्दांचा वापर त्यांनी मोठ्या चतुराईने केल आहे. ही अद्भुतरसाची वाट थोडी अवघड. तीवर फारसे कुणी पाऊल घालीत नाही. कुणी या वाटेने माता सरस्वतीच्या दालनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केलाच तर अपार कष्टान्शिवाय त्याला या प्रांतात यश लाभणे अशक्यप्राय. 'मर्मभेद' कादंबरी लिहून श्री. शशी भागवतांनी या प्रांतात प्रवेश तर केलाच, पण यशाचा झेंडाही रोवला. 'रत्न-प्रतिमा' लिहून त्यांनी त्या प्रांतातला आपला शिक्का खणखणीत बंदा रुपया आहे, ही गोष्ट सिद्ध केली आहे.
-
Marmabhed (मर्मभेद)
सम्राट चन्द्रकेतु महाराज,वीरभद्र आदी सर्व लोकांच्या नेत्रात कमालीची उत्सुकता दिसू लागली. तेजस्विनीचे हृदय धडधडले. तिचे चित्त कावरेबावरे झाले. आपला प्रियकर कोण असावा याबद्दल ती नेहमी घोटाळ्यात पडत असे. आज आता तो क्षण आला होता. नेत्रात प्राण आणून तेजस्विनी त्या योध्याकडे पाहू लागली, त्या योध्याने शांतपणे आपल्या मुखावरील पातळ दूर केले. त्या मुखपटला आड लपलेला त्याचा तेजस्वी आणि सुंदर चेहरा दृष्टीस पडला; मात्र.... अचानक विद्युतपात होऊन त्याच्या प्रखर तेजाने स्थळकाळाची शुद्ध हरपावी तसा प्रकार तेथे घडला. स्वतः कृष्णांत पावलाखालील धरित्री अचानक फाटावी तसा दचकून मागे धडपडला. "युवराज कुणाल?" कृष्णांत अविश्वाने ओरडला. "युवराज कुणाल...." सम्राट महाराजांना तो धक्का अनपेक्षित होता. आनंदातिशयाने क्षणभर त्यांना मूर्च्छा आली. "युवराज.." तेजास्वीनीचे मुख क्षणभर निस्तेज बनले. तथापि, दुसरयाच क्षणी तिच्या सुंदर चेहऱ्यावर लज्जेने रक्तिमा फुलविला. वीरभद्राच्या नेत्रात अश्रू दाटून आले. "होय; युवराज कुणाल!" तो योध्दा शांतपणे म्हणाला. "परंतु निर्बल, बुद्धिहीन आणि निस्तेज युवराज नव्हे." "अशक्य... अशक्य..." कृष्णांताचा अद्यापही विश्वास बसत नव्हता.