-
Saaj Sahyadricha (साज सह्याद्रीचा )
किल्ले फिरण्याची आवड जपणारा, गिर्यारोहणाचा ध्यास घेतलेला एक मोठा वर्ग देशात आहे. त्यांना किल्ल्यांबद्दल आत्मीयता आहे. या ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी असे लोक जीव ओतून काम करताना मी जवळून पाहिले आहेत. दुर्गसफर म्हणजे येणार्या पिढीची योग्य जडणघडण होण्याचे प्रभावी माध्यम आहे, त्यामुळे तरुणांनी किल्ले चढायला हवे. ही शिवस्थळे जपणे, त्यांचे संवर्धन करणे म्हणजे देशाच्या प्रेरणादायी इतिहासाचे संगोपन करण्याचे कार्य आहे. म्हणून तरुणवयात या रांगड्या सह्याद्रीशी मैत्री करणे गरजेचे आहे. किल्ल्याचा इतिहास जाणून आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गाथा युवापिढीच्या रक्तात भिनायला हव्या. आज देशाला अशा तरुण रक्ताची गरज आहे ज्यांना हिंदुस्थानाच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान आहे. चला तर मग, महाराष्ट्रातील दुर्गसफरीचा आनंद घ्या, भरपूर फिरा.