-
Ishara (इशारा)
माणसातल्या पशुत्वाचं दर्शन घडवणाऱ्या दोन दीर्घकथांचा संग्रह. लेखक माधव दामले यांच्या ओघवत्या लेखनशैलीमुळे ‘प्रतिलिपी’ या ॲपवर अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या दीर्घकथांचा संग्रह वाचकांसाठी पुस्तकरूपात उपलब्ध.
-
Avakash Peltana (अवकाश पेलताना)
कादंबरीकार प्रियांका कर्णिक यांचा हा पहिला कथासंग्रह. संघर्ष आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक द्वंद्वांचं वैविध्यपूर्ण चित्रण असणारा कथासंग्रह
-
Atrupta (अतृप्त)
सिनेसृष्टीतील गाजलेले चित्रकार आणि संवेदनशील लेखक श्रीकांत धोंगडे यांनी मीनाकुमारीच्या जीवनावर ‘अतृप्ता’ हे नवे पुस्तक लिहिले आहे. खरं तर मीनाकुमारीच्या जीवनावर अनेक भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित झाली आहेत. परंतु, श्रीकांत धोंगडे यांचे हे पुस्तक लक्षणीय आहे. कारण तिच्या जन्मापासून अखेरपर्यंतचे हे शोधचरित्र आहे. मीनाकुमारी राहत असलेल्या दादर परिसरातील रहिमाबाई चाळीपासून श्रीकांतजींनी शोधकार्य सुरू करून सलग साडेतीन वर्षे तिच्या जीवनाचा धांडोळा घेतला आहे. अन् अनेक दुर्मिळ फोटो शोधून काढले आहेत. त्यामुळे या पुस्तकात एक हजार फोटोंचा दुर्मिळ साठा तिच्या चाहत्यांना पाहायला मिळेल. “शिवाय या पुस्तकात पेन, पेन्सिल व चारकोलने श्रीकांतजींनी केलेले मीनाकुमारीचे १६ पोर्टेटस् आहेत,” त्यांच्या काळजाला भिडलेली, मनात शिरलेली आणि मेंदुत भिनलेली मीनाकुमारी त्यांनी या पुस्तकात उभी केली आहे.
-
Shrimant Aanandibai Peshave (श्रीमंत आनंदीबाई पेशवे)
ध चा मा केला नसतांनाही...बदनाम झालेली...पेशवाईतील वादळज्योत... श्रीमंत आनंदीबाई पेशवे यांच्या जीवनावरील एक ऐतिहासिक कादंबरी
-
Ardhakaurav (अर्धकौरव)
एकशे एकवा कौरव – अर्धकौरव. कारण धृतराष्ट्र आणि वैश्य दासी सुघडाचा पुत्र. दासीपुत्र, क्षत्ता.. सूत… किंवा शूद्र. ह्या शूद्र पण महारथी, महाबली, नीतिवान, धर्मनिष्ठ युयुत्सूची… उपेक्षित युयुत्सूची कहाणी… अर्धकौरव.