Lapavlelya Kacha (लपवलेल्या काचा)
-
Lapavlelya Kacha
|
|
Price:
250
|
Front Cover
|
Back Cover
|
|
कलावंताचं मन, तरीही एक त्रयस्थपणे पाहण्याची शक्ती आणि सुक्ष्म निरीक्षण यांतून सलीलचं लिखाण फुललं आहे !
त्याने या लपवलेल्या काचा अशाच शोधून काढत राहायला हव्यात
कारण अशा काचा कधीच व्यक्तिगत उरत नसतात -
अशा काचांच्या झुंबरहंड्याच अनेकांची मनं उजळवीत असतात ! -संदीप खरे
‘लपवलेल्या काचा’ या डॉ. सलील कुलकर्णी लिखित पुस्तकाचं प्रथमदर्शनी वैशिष्टय़ नजरेत भरतं ते या पुस्तकाची आगळीवेगळी आणि आकर्षक अशी मांडणी. रविमुकुल यांनी या पुस्तकाची मांडणी करताना सलील कुलकर्णी यांच्या विविध भावमुद्रा टिपणाऱ्या रेखाचित्रांचा वापर केला आहे, तसंच नवीन प्रकरणाच्या सुरुवातीला हस्ताक्षरातील मजकूर टाकण्याची कल्पना या ललित लेखसंग्रहाला एकदम साजेशी ठरली आहे.
मांडणीमुळे नजरेत भरणारं हे पुस्तक मनाचाही ठाव घेतं. कारण यातले ललित लेखांचे विषय सहजी कोणाच्याही मनाशी नातं जोडणारे. ज्यांना ललित लिखाण आवडतं, त्यांना तर त्यांच्याच मनाचं प्रतििबब या पुस्तकात पडल्यासारखं वाटेल. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटना; आनंद देणाऱ्या, दु:खी करणाऱ्या, अस्वस्थ करणाऱ्या, चिडचडीस कारणीभूत होणाऱ्या, राग देणाऱ्या.. वेळोवेळी आपण त्यांच्यावर मतं व्यक्त करत असतो. कधी प्रत्यक्षपणे किंवा कधी मनातल्या मनात. त्याच विविधरंगी भावना या पुस्तकात शब्दांच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या आहेत.