Chaugheejani (चौघीजणी)
-
Chaugheejani (चौघीजणी)
|
|
Price:
300
|
Front Cover
|
Back Cover
|
|
लुइसा मे अल्कॉट या ख्यातनाम अमेरिकन लेखिकेची 'लिटल् वुईमेन’ ही कादंबरी १८६८ साली प्रथम प्रकाशित झाली. प्रसिद्धीबरोबरच तिला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली. अनेक भाषांमधून ती अनुवादित झाली आहे. हॉलिवुडने तिच्यावर दोन वेळा चित्रपटही काढले आहेत.
'लिटल् वुईमेन’ ही अमेरिकेतल्या 'मार्च’ कुटुंबाची - विशेषत: त्यातल्या मेग, ज्यो, बेथ आणि ऍमी या चार बहिणींची कहाणी आहे. या व्यक्तिरेखा लेखिकेने आपण व आपल्या बहिणी यांच्यावरूनच बहुतांशी रंगवल्या आहेत. शेजारचे वृद्ध लॉरेन्स आजोबा आणि त्यांचा देखणा प्रेमळ नातू लॉरी यांनी या कथेत आणखी अनोखे रंग भरले आहेत. हे एक अतिशय हृद्य आणि विलोभनीय असे कुटुंबचित्र आहे.
एकमेकींपासून स्वभावाने अगदी वेगळ्या असलेल्या मार्च बहिणींचे परस्परांवरील उत्कट प्रेम, त्यांच्या आशा-आकांक्षा, कोवळी सुखदु:खे, भविष्याची स्वप्ने यांचे हे कधी विनोदी, तर कधी हृदयस्पर्शी असे चित्रण आपल्या साध्या सच्चेपणामुळे वाचकाला थेट अखेरपर्यंत गुंतवून ठेवते..."