The Hobbit (द हॉबिट)
-
The Hobbit (द हॉबिट)
|
|
Price:
495
|
Front Cover
|
Back Cover
|
|
"द हॉबिट' ही एक कल्पनारम्य गूढकथा आहे किंवा गूढ अशी कल्पनाकथा आहे. मुलांसाठीच असल्यामुळे तीमध्ये मुलांच्या कल्पनाविश्वात जे जे साहसी, धाडसी, गूढ, कल्पनारम्य, अगम्य असे असेल ते ते सर्व या कादंबरीत आहे. मुलांच्या विश्वातील मनोव्यापाराला तार्किक व तर्कसंगत प्रश्न विचारायचे नसतात किंवा त्या प्रश्नांची उत्तरं कार्यकारणभाव सिद्धान्ताचा वापर करून शोधायची नसतात. कल्पनारम्य मनोव्यापार हीच ती संगती आहे.
टॉल्किनने याच सूत्राचा वापर करून "द हॉबिट' लिहिली आहे. पराक्रम, धाडस, जादू, चमत्कार या सर्व गोष्टींची रेलचेल "द हॉबिट'मध्ये असल्याने वाचक त्यात आकंठ बुडून जातो आणि त्यातील ड्वार्फसबरोबर त्याचाही प्रवास सुरू होतो. "द हॉबिट' हाच एक चित्तथरारक प्रवास आहे. कारण टॉल्किनने कादंबरीच्या पर्यायी नावातच त्या प्रवासाचे सूचन केले आहे.