Punha Ekada Aavaghad Afghanistan ( पुन्हा एकदा अवघड अफगाणिस्तान )
-
Punha Ekada Aavaghad Afghanistan ( पुन्हा एकदा अवघ
|
|
Price:
200
|
Front Cover
|
Back Cover
|
|
अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमधील शीतयुद्धात भरडल्या गेलेल्या अफगाणिस्तानची घडी आजही व्यवस्थितपणे बसलेली नाही. पत्रकार निळू दामले यांनी २००३ मध्ये या देशात फिरून त्याचे रिपोर्ताज ‘अवघड अफगाणिस्तान’ या पुस्तकाच्या माध्यमातून मांडले होते. याच सुमारास तालिबान्यांचा पाडाव झाल्याने तेथे शांतता नांदेल, अशी अटकळ जगभरात व्यक्त होत होती. मात्र, अनेक जमातींमध्ये विभागल्या गेलेल्या आणि सांस्कृतिक-धार्मिक कल्पनांमध्ये रूतलेल्या अफगाणिस्तानवर आजही तालिबान्यांचा प्रभाव आहे, हे दामले यांना त्यांनी २००७ साली केलेल्या या देशाच्या दुसर्या यात्रेत आढळले.
या यात्रेदरम्यानचे अनुभव आणि अफगाणिस्तानवरील अन्य मजकुराचा अभ्यास करून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. तालिबानींच्या अस्तित्वामुळे अमेरिकी फौजांना तेथून पूर्णपणे माघारी जाणे अशक्य असल्याने अफगाणिस्तानचे आणि तालिबान्यांच्या प्रभावाखाली असलेल्या पाकिस्तानचे भवितव्य काय, हे सांगणे कठीण आहे, हा त्यांनी काढलेला निष्कर्ष अस्वस्थ करतो.