Rasikho! (रसिकहो! )
-
Rasikho! (रसिकहो! )
|
|
Price:
200
|
Front Cover
|
Back Cover
|
|
आपल्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जीवनातले एक चैतन्यशील, समृद्ध व्यक्तिमत्व, विनोद, नाट्य, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन, सामाजिक चिंतन अशा अनेक अंगांनी पु. लं. चे लेखन गेले अर्धशतक मराठी मनाचे रंजन आणि उद्बोधन करीत आले आहे. त्याबरोबरच रंगमंच आणि रजतपट यांवरील अभिनय आणि संगीताच्या क्षेत्रातले विविध अविष्कार यांच्या योगानेही त्यांनी रसिकांना भरभरून आनंद दिला आहे.
आपल्या विविध आणि विपुल लेखनातून पु. लं. नी वाचकांशी दृढ नाते जोडले. रंगभूमीवरील नाटके आणि ‘बटाट्याची चाळ’, ‘असा मी असामी’ सारखे एकपात्री प्रयोग व ‘वार्यावरची वरात’ सारख्या बहुरंगी कार्यक्रमांतून त्यांनी प्रेक्षकांशी परोक्ष संवाद साधला; त्याबरोबरच वेळोवेळी साहित्य, संगीत, नाट्य, अभिनय, सामाजिक संदर्भ घेऊन आलेले विषय यांवरील आपल्या अनेक भाषणांनी ते श्रोत्यांशी प्रत्यक्ष बोलत राहिले. वक्तृत्व हा पु. लं. च्या वाङ्मयीन आणि कलाप्रेमी व्यक्तिमत्वाचाच एक रसरशीत, संपन्न, सुंदर अविष्कार. प्रदीर्घ, व्यासंग, संदर्भसंपन्नता, प्रसन्न विनोद आणि गंभीर चिंतनशीलता यामुळे पु.लं. चे कोणतेही भाषण हा श्रोत्यांच्या दृष्टीने एक मनोज्ञ अनुभव असतो. निखळ प्रांजळपणा हा या भाषणांचा प्राण आहे आणि पु. लं. च्या अंगभूत अभिनयगुणांनी त्यांना एक वेगळे समर्थ परिमाण दिले आहे. आजपर्यंत केवळ स्थानिक लोकांनीच ऐकलेली, किंवा वृत्तपत्रांतून त्या त्या वेळी छापून आलेली पु. लं. ची भाषणे आता प्रथमच ग्रंथरुपाने प्रसिद्ध होत आहेत. वाचकांना ही एक आनंदपर्वणी वाटेल यात शंका नाही.