Shantarama (शांतारामा)
-
Shantaram (शांतारामा)
|
|
Price:
800
|
Front Cover
|
Back Cover
|
|
भारतीय चित्रपटसृष्टीने शताब्दीत पदार्पण केले आहे. अशा वेळी या क्षेत्राच्या उभारणीत महत्वाचा वाटा उचलणा-यांचे स्मरण होणे साहजिक आहे. ज्याने या चित्रपटसृष्टीचा इतिहास घडविला, अंतरराष्ट्रीय सिनेक्षेत्रात भारतीय भारतीय सिनेमाचा पाया रोवला, अशा चित्रपटमहर्षी व्ही. शांताराम यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. शांताराम नावाच्या माणसाच्या आयुष्याचा जीवनपट व्ही. शांताराम यांनी 'शांतारामा' या आत्मचरित्रात रेखाटला आहे.
अनेक खाचखळग्यांनी भरलेल्या या जीवनमार्गात आनंदाचे, समृद्धीचे क्षण त्यांनी उपभोगले. तसेच संकटांचा डोगरही त्यांना चढावा लागला. वयाच्या एकोणिसाव्या वर्षापासून त्यांनी आपल्या एकसे ऐक कलाकृतींनी रसिकांना तृप्त केले. 'प्रभात फिल्म कंपनी' स्थापन करून पौराणिक,ऐतिहासिक, मूक व बोलपट त्यांनी निर्माण केले. ते आजही रसिकांना आठवतात. प्रभात व व्ही. शांताराम यांचे नाते या आत्मकथेतून उलगडते.तसेच 'राजकमल कला मंदिर' च्या प्रगतीची वाटचाल समजते. कलावंत, दिग्दर्शक, संस्थाचालक या नात्याने त्यांनी केलेले हे आत्मकथन म्हणजे चित्रपट सृष्टीचा आत्मा आहे.