Bhavgandh (भावगंध)
-
Bhavgandh (भावगंध)
|
|
Price:
250
|
Front Cover
|
Back Cover
|
|
"पुलं'नी 1945 च्या सुमारास सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या काही कथा लिहिल्या. मात्र, त्या पुस्तकरूपाने आजवर प्रकाशित झाल्या नाहीत. पुलंच्या स्मृतिदिनानिमित्ताने परचुरे प्रकाशनाच्या "भावगंध' या पुस्तकातून त्या प्रकाशित केल्या आहेत. कथांबरोबरच पुलंनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा आणि श्रद्धांजलीपर लेखाचाही त्यात समावेश आहे. "पुलप्रेमी' भाऊ मराठे यांनी त्याचे संकलन केले आहे.
"सात-आठ वर्षे "पुलं'वर संशोधन करत आहे. त्यादरम्यान मला त्यांचे अप्रकाशित साहित्य सापडले. विनोदी लिहिणारे पुलं किती गंभीर लिहू शकतात, हे "भावगंध'मध्ये दिसेल. ते वाचताना अक्षरशः वाचकाला रडू येते.'' - भाऊ मराठे
"या पुस्तकातील कथांच्या माध्यमातून "रडवणारे पुलं' वाचकांसमोर येतील. रोहिणी भाटे, जितेंद्र अभिषेकी, माडगूळकर, भाऊसाहेब बांदोडकर अशा अनेक दिग्गजांवरील त्यांची व्यक्तिचित्रेही यात आहेत.''- प्रकाशक अप्पा परचुरे