Katha Panchdashi (कथा पंचदशी)
-
Katha Panchdashi (कथा पंचदशी)
|
|
Price:
250
|
Front Cover
|
Back Cover
|
|
‘कथा पंचदशी’ या संग्रहात महाश्वेतादेवींच्या निवडक पंधरा कथा मराठीत अनुवाद करून प्रस्तुत केल्या आहेत. महाश्वेतादेवींचे नाव फक्त त्यांच्या लेखनातूनच नव्हे तर इतरही अनेक महत्त्वाच्या कार्यक्षेत्रांमधून सर्वश्रुत आहे.
महाश्वेतादेवींच्या कथा वेगळ्या धाटणीच्या आहेत हे तर खरेच; पण त्यांचे खास वैशिष्टय़ म्हणजे त्या सामाजिक शोषणाच्या उतरंडीतल्या सर्वात तळातल्या शोषित स्तराचा नेमका वेध घेतात. त्यांच्या कथा म्हणजे या तळागाळातल्या माणसांच्या जीवनातील शोषणाचे-विस्थापनाचे-अगतिकतेचे-प्रेमाचे-ताटातुटींचे-तडफडीचे जिवंत चित्रण प्रभावीपणे व सुघड बांधणीत सहजपणे करणा-या नव-पुराणकथा ठरतात.