Kunabyacha Gana (कुणब्याचं गाणं)
-
Kunabyacha Gana (कुणब्याचं गाणं)
|
|
Price:
90
|
Front Cover
|
Back Cover
|
|
शेतक-याचं कष्टप्रद जीवन, त्याची कर्तव्यनिष्ठा, त्याचं काळ्या मातीशी इमान त्याचं मुक्या जित्राबावरचं त्याचं विठोबावरची निस्सीम भक्ती, माणुसकीवरची आपर श्रद्धा अविरत मेहनतीची तयारी अन सहनशीलता स्थितप्रज्ञता मला लिहितं करते.
मातीतून जसे तृणांकुर रुजून येतात अन आभाळाशी मुक्त सवांद साधत वा-यावर डोलत राहतात, अशी कविता रुजून येते. आतून, खूप आतून, मनाच्या अंत:करणाच्या गाभ्यातून!
सृजनाची, सर्जनाची व प्रतिभेचि कुंडलं भेदून भावाविष्काराच्या, भावव्याक्तीच्या रुपात कविता हळुवार अलगद प्रकटते अन तिचा गंध आसमंतात दरवळत राहतो