Tiger Hevan (टायगर हेवन)
-
Tiger Hevan (टायगर हेवन)
|
|
Price:
200
|
Front Cover
|
Back Cover
|
|
वाढती लोकसंख्या, जंगलतोड, वाढत्या लोकसंख्येला अन्न मिळावं यासाठी लागवडीखाली येणारी जमीन अशा मानवनिमिर्त समस्यांमुळे वन्य प्राण्यांचं क्षेत्र कमी होऊ लागलं आणि त्यांचं अस्तित्वच धोक्यात आलं. हिमालयाच्या पायथ्यापासून ते नेपाळच्या हद्दीपर्यंत पसरलेल्या दाट जंगलाचा आणि जंगली प्राण्यांचा विनाश पाहूनच एकेकाळचे शिकारी अर्जनसिंग यांचं मनपरिवर्तन झालं आणि त्यांनी प्राण्यांच्या रक्षणाकरता अभयारण्यच उभारण्याचं ठरवलं. शिकारी ते संरक्षणवादी असा त्यांचा झालेला विलक्षण प्रवास आणि त्या प्रयत्नांतून झालेली 'दुधवा अभयारण्या'ची उभारणी 'टायगर हेवन'मध्ये आहे. आज दुधवा राष्ट्रीय अभयारण्य दिसतंय ते केवळ अर्जनसिंग यांच्या अथक प्रयत्नांमुळेच.
इंदिरा गांधींनी १९७२मध्ये व्याघ्रप्रकल्प व राष्ट्रीय उद्यान जाहीर करण्याआधीची ही कथा आहे. या पुस्तकात लेखक वाचकाला स्वत:बरोबर जंगलात घेऊन जातो. वन्य प्राण्यांच्या सवयी, लकबी, तेथील निसर्ग यांची ओळख करून देतो आणि जंगलसफरीचं अफलातून दर्शन घडवतो. मूळ पुस्तक मराठीतच लिहिलं असावं, असं वाटण्याइतकं ओघवतं भाषांतर विश्वास भावे यांनी केलं आहे. वन्य प्राण्यांचं संरक्षण व संवर्धन म्हणजे केवळ शिकारीवर बंदी नव्हे, तर त्यांचा अधिवास संरक्षित करणे. त्यांना लागणाऱ्या इतर गोष्टी म्हणजे पाणी, भक्ष्याचा पुरवठा, नरमादी गुणोत्तर आणि महत्त्वाचं म्हणजे माणसं आणि गुरांना संपूर्ण बंदी... खरंतर संवर्धन करणे म्हणजे एखाद्या जंगलात माणसाने 'काहीही न करणं'... निसर्ग आपोआप स्वत:ची काळजी घेतो... असं लेखक म्हणतो.