Shreekrushan Sathalyatra (श्रीकृष्ण स्थलयात्रा)
-
Shreekrushan Sathalyatra (श्रीकृष्ण स्थलयात्रा)
|
|
Price:
240
|
Front Cover
|
Back Cover
|
|
गीता आदिनाथ हरवंदे यांनी यापूर्वी देशातील विविध तीर्थक्षेत्रांची माहिती देणारे पुस्तक लिहिले आहे. आता श्रीकृष्णाचे जिथे जिथे वास्तव्य होते त्या त्या ठिकाणी दौरा करून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
श्रीकृष्णाचा पदस्पर्श झालेली ठिकाणे 9 राज्यांत विखुरलेली आहेत. आसाम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाना, केरळ, दिल्ली, बिहार या राज्यांतील विविध ठिकाणे आणि तेथील आताची स्थिती याबद्दल हरवंदे यांनी विस्ताराने लिहिले आहे. श्रीकृष्णाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या ठिकाणाची माहिती ही कल्पनाच विलक्षण आहे. हरवंदे यांनी मथुरेपासून सुरवात करून इंद्रप्रस्थपर्यंतची सर्व माहिती आजच्या संदर्भासह देताना या स्थळाबद्दल असलेल्या आख्यायिका आणि दंतकथा याचीही थोडक्यात माहिती दिली आहे. भक्ती व यात्रा या दृष्टीनेच हे पुस्तक महत्त्वाचे आहे असे नाही तर ज्यांना इतिहास आणि भूगोल जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांच्यासाठीही हे पुस्तक महत्त्वाचे आहे.