Vkrutva Kala Ani Sadhana (वकुत्व कलाआणि साधना)
-
Vkrutva Kala Ani Sadhana (वकुत्व कलाआणि साधना)
|
|
Price:
120
|
Front Cover
|
Back Cover
|
|
अनेक नामंकित देशी-परदेशी वक्त्यांची भाषणे मी ऐकत असे नि ऐकलीही होती. कित्येकांची तर
ध्वनिलिखितही केलेली होती. प्रत्येकाची लकब निराळी. काही केवळ विद्वतेच्य प्रदर्शनासाठी बोलत. त्यांची व्याखाने श्रोते पुराणिकाच्या ठराविक धाटणीसारखी भक्तीभावाने ऐकत. ऐकत म्हणजे काय? तर एका कानाने ऐकून दुस-या कानाने बाहेर सोडीत.कसं काय झालं व्याख्यान? तर वक्ता विद्वान, विलक्षण अभ्यासू. आपल्याला समजणार त्यात, हा परिणाम. कित्येकांची भाषणे मधुरमधुर शब्दांचा नुसता सडा. श्रोत्यांनी नुसता ऐकावा नि कौतुक करीत सभागृहाबाहेर पडावे. कित्येकांची भाषेपेक्षा हातवारेच जबरदस्त. असले नाना प्रकार पाहून वकृत्व- परिणामकारक वकृत्व असावे कसे आणि ते कमवण्यासाठी उमेदवारांनी स्वधायाची, आवाजाच्या कमावणीची, हावभाव मुद्राभियनाची कसकशी तयारी केली पाहिजे, इत्यादी अनेक मुद्दयांची मी चार-पाच वर्षे टिपणे करीत होतो, आणि त्याविषयीची पाश्चात्य पुस्तके अभ्यासित होतो.