Karmayog (कर्मयोग)
-
Karmayog (कर्मयोग)
|
|
Price:
270
|
Front Cover
|
Back Cover
|
|
जीवनात श्वास जसा महत्वाचा,तशी परमपिता परमात्म्याची ओळख महत्वाची आहे. सर्व व्यवहार त्याच्या साक्षीनेच झाले पाहिजेत. सर्व व्यवहारात त्याचा आशीर्वाद पाहिजे,त्याशिवाय कोणत्याही कार्यात यश संभवणार नाही.
मानवी जीवनात यश हि अत्यंत महत्वाची बाब आहे. यशप्राप्तीसाठी मेहनत हा एकच सर्वोत्तम मार्ग आहे. मेहनत फलदायी होत असते,अन्य मार्ग फलदायी असतीलच असे नाही. मेहनतीच्या मार्गातून मिळणारे यश फसवे, क्षणिक किंवा मृगजळाप्रमाणे भूलभुलैय्या असते. जे शेवटपर्यंत टिकणार नाही,ते त्याच्या अस्तानंतर आपणास त्रासदायक ठरते, आणि त्रासदायक ठरणारे मिळण्यापेक्षा न मिळणे बरे,असे शेवटी वाटते. मिळून पश्चाताप होण्यापेक्षा न मिळता झालेला पश्चाताप कमी त्रासदायक असतो.