Vishwache Aarta (विश्वाचे आर्त)
-
Vishwache Aarta (विश्वाचे आर्त)
|
|
Price:
250
|
Front Cover
|
Back Cover
|
|
पर्यावरण हा तसा आपल्या सर्वाच्याच जगण्याला वेढून असलेला विषय, तरीही आपण पर्यावरणाच्या संदर्भात कमालीचे गाफील आणि बेफिकीर असतो. पाणी, जमीन, जंगल अशा सर्वच घटकांबाबत असलेली आपली बेपर्वाई एक दिवस आपला कडेलोट करणार, असे आपण वारंवार वाचतो, ऐकतो, तरीही याबाबत आपण किंचितही गंभीर नसतो. सर्वच पातळ्यांवर दिसून येणारी ही अनास्था हा अतुल देऊळगावकर यांच्या 'विश्वाचे आर्त' या पुस्तकाचा गाभा आहे.
पर्यावरण ही बाब केवळ नैसर्गिक नाही तर त्यात बेमालूमपणे सामाजिक आणि राजकीय रंगही मिसळले आहेत, हे साधार दाखवून देतानाच सध्या जैवविविधता जपणारे व नष्ट करणारे यांच्यातल्या संघर्षांचे अनेक पैलू देऊळगावकर उलगडतात. अभ्यासकांच्या अहवालापासून ते समकालीन साहित्य, चित्रपट, छायाचित्रे अशा विपुल संदर्भासह त्यांनी हा विषय मांडला आहे. तरीही केवळ संदर्भ किंवा आकडेवारीत हे पुस्तक गुरफटले नाही तर सुरुवातीपासून शेवटापर्यंत ते आपल्याला भानावर आणण्याचे काम करते. प्रश्नांची उकल, दुसरी बाजू आणि उपाय अशा पातळ्यांवर विषयाचा धांडोळा घेत असतानाच आपल्यातल्या विवेकबुद्धीला आवाहन करण्याचे काम करते.