Ya Shetane Lala Lavila (या शेताने लळा लाविला)
-
Ya Shetane Lala Lavila (या शेताने लळा लाविला)
|
|
Price:
125
|
Front Cover
|
Back Cover
|
|
शेती म्हणजे भुई रुजवण्याची किमया.जगाचं उदरभरण करण्यासाठी माणसाला मिळालेलं वरदान! भूईची सेवा करणाऱ्या शेतकरी बळीवंतना मी ईश्वर मानतो.
पण तोच शेतकरी आज मरणप्राय झाला आहे. आत्महत्येची काळोखी वाट चालू लागला आहे.
मीही औरंगाबाद जिल्ह्यातल्या पळसखेड या माझ्या गावी गेली पन्नास वर्ष शेती करतोय. इथली जमीन म्हणजे बरड टेकड्या. जवळ नदी-नाला नाही. केवळ कोरडवाहू शेती. त्यात सततचे दुष्काळ,अतिवृष्टी,गारपीट,सरकारी अनास्था. पण अस्मानी आणि सुलतानी दोन्ही प्रकारच्या संकटांना तोंड देत मी शेतीत टिकून राहिलो. कितीदा उध्वस्त झालो,पण दर वेळी जिद्दीने उभा राहिलो. नवं तंत्र,नवी पीकपद्धत वापरली. पाणी साठवणीचे नाना प्रयोग केले. आणि शेती बहरत गेली. विकासाची हि गंगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचावी,यासाठी सरकारच्या पाठीशी लागून प्रयत्न करत राहिलो.
मला या अनुभवातून कळलेलं शेती-पाण्याचं ज्ञान समाजाला द्यावं,या हेतूने सांगितलेली,हि माझी शेतीशी संबंधित आत्मकथा.