Aagishi Kheltana (आगीशी खेळताना)
-
Aagishi Kheltana (आगीशी खेळताना)
|
|
Price:
180
|
Front Cover
|
Back Cover
|
|
उत्तर प्रदेशातील नऊ सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेले हे लेखन आहे. त्यातील दोघी जनी पहिल्या फळीत, तर सात जणी गाव पातळीवर क्षेत्रकाम करणाऱ्या. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्या आहेत. त्यामुळे या लेखनाला वेगळे परिमाण लाभले आहे.
खूप वेगळे अनुभवविश्व त्यातून प्रगट होते. स्त्रीविषयक अनेक प्रश्न यांतून उपस्थित होतात. चळवळीतील कार्यकर्त्या स्त्रियांचे जग, त्यांची सामाजिक स्थिती, वैचारिक आंदोलने, स्वयंसेवी संस्था असे वेगळे जग समजते.
'आम्ही अबला नाहीच, पण अडाणी विचारशून्य याचकही नाही, ' हा विचार या स्त्रियांच्या लेखनातून समोर येतो. बोलीभाषेचा वापर, साधी - सोपी मात्र आशयगर्भ भाषा ही लेखनाची वैशिष्ट्ये आहेत.लेखिका कविता महाजन यांनी केलेला अनुवाद मूळ लेखन वाटावा एवढा सरस!