Kathakumb (कथाकुंभ)
-
Kathakumb (कथाकुंभ)
|
|
Price:
220
|
Front Cover
|
Back Cover
|
|
'चैतन्याला जपण्यापेक्षा त्याला फुलवायला हवं
देवत्वाला पुजण्यापेक्षा त्याला शोधायला हवं'
असं म्हणणारे विलास राजे…परिवर्तनवादी विचारांचे ते खंदे
पुरस्कर्ते आहेत. ग्रामीण जीवनाचे अस्सल रंग कथेचा
माध्यमातून, शब्दचित्रांतून ते सादर करतात, आणि वाचकाला
आपलंसं करतात ….
प्रस्तुतचा 'कथाकुंभ' हा विलास राजेंचा पहिलावहिला कथासंग्रह
तो वाचताना वाचकाला लेखकाचा रुपात प्रगल्भ, जाणता
सारस्वत भेटतो… त्याच वेळी त्याचं हे पहिलंच पाऊल आहे ,
याचीही काही ठिकाणी जाणीव होते. या लेखकाच पर्दापण मात्र
दमदार आहे… चांगली कथा कोणती? जी वाचकाचा मनाला
स्पर्श करते, त्याच्या हृदयाशी संवाद साधते. त्याचा पूर्वस्मृती
ताज्या करते…. कधी निखळ , मनोरंजन करते. हसवते. वाचकाची
दोन घटका करमणूक करते….तर कधी कथेचा माध्यमातून
जीवनमुल्याचा सूचकतेने, कलात्मकतेने पुरस्कार करते…
विलास राजे म्हटल्याप्रमाणे 'या कथा हसवतील, चिमटे
काढतील, तर कधी अंतमुर्खही व्हायाला लागतील.'
प्रस्तुत संग्रहात अनेक कथा अशा आहेत कि, त्या सत्यकथा
वाटाव्यात, अस्सल वाटाव्यात…. अशा नमुनेदार व्यक्तिरेखा,
या कथातून समोर येतात कि वाचक त्यांना विसरणार नाही;
प्रतिकूलतेवर स्वार होणाऱ्या झुंजार, लढाऊ! तर कधी अत्यंत
सोशीक, प्रांजळ! उदार मनाच्या! दुसऱ्याचा दुख वाटून घेणाऱ्या…
आशावादी, प्रयत्नवादी!
प्रस्तुत संग्रहातली काही पात्र, म्हणूनच मस्त आहेत.ती कुणी
तत्वज्ञ नाहीत.भाष्यकार नाहीत;पण त्याचा वागण्या-
बोलण्यातून शहाणपणाच्या चार गोष्टी ती सांगतात…
आपण लेखकाला धन्यवाद देतो.शुभेच्छा देतो.