Gappa Cinemachya (गप्पा सिनेमाच्या)
-
Gappa Cinemachya (गप्पा सिनेमाच्या)
|
|
Price:
200
|
Front Cover
|
Back Cover
|
|
जावेद अख्तर यांची नसरीन मुन्नी कबीर यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत म्हणजे हे पुस्तक. एका प्रतिभासंपन्न कवी आणि लेखकाबरोबर साधलेला हा संवाद आपल्यासमोर जावेदसाब यांचं आयुष्य उलगडून दाखवतो. त्यांचं कौटुंबिक जीवन, त्यांच्या लिखाणावर सुरुवातीच्या काळात पडलेला प्रभाव, सलीम खान यांच्याबरोबरचा प्रवास अशा अनेक गोष्टींवर यातून प्रकाश पडला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये १९६५ च्या दरम्यान क्लॅपरबॉय म्हणून सुरू केलेली कारकीर्द या मुलाखतीमधून समोर येते. हिंदी चित्रपटाची परंपरा, गीतलेखन आणि पटकथालेखन या वेगवेगळ्या घटकांवर तर जावेदसाब बोलले आहेतच, पण स्वत:चे राजकीय विचारही त्यांनी स्पष्टपणे मांडले आहेत.
म्हणूनच चित्रपट कलेविषयी आस्था आणि रुची असणार्यान सगळ्यांसाठी चंद्रकांत भोंजाळ यांनी अनुवाद केलेलं हे पुस्तक महत्त्वाचं ठरेल असा विश्वास वाटतो.