Shukkatha (शुककथा)
-
Shukkatha (शुककथा)
|
|
Price:
300
|
Front Cover
|
Back Cover
|
|
'शुककथा' हा मूळ संस्कृत भाषेत लिहिल्या गेलेल्या 'शुकसप्तती' या ग्रंथातल्या सत्तर कथांचा अनमोल ठेवा.
वाक् चतुर आणि पतीविरहात मनोमन झुरत असल्याने कदाचित कुमार्गाला जाऊ शकणारी एक विरहोत्कंठिता यांच्यातल्या संवादावर आधारित या कथा असून, यातल्या प्रणयोत्सुक, धाडसी, धूर्त आणि परिस्थितीशी दोन हात करून स्वप्राणरक्षण करण्यात तरबेज स्त्रिया या कथांची रंगात आणखी वाढवतात.
बुद्धिमान शुकानं आपल्या रसाळ, ओघवत्या शैलीत स्वामिनीला ऐकवलेल्या बोधपूर्ण कथा आणि त्यायोगे स्वामिनीचं चारित्र्यहनन टाळण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न, हे ' शुककथा ' चं सार. साहस, शृंगार, विनोद, बुद्धीचातुर्य, धाडस अशा विविध काव्यरसांनी सजलेल्या या कथा खिळवून ठेवणाऱ्या आहेत.