Click to view categories for English Books
  • Academic
  • Astrology & Numerology
  • Biography & Autobiography
  • Business & Finance
  • Classics
  • Cookery
  • Fiction
  • Health & Fitness
  • History & Politics
  • Horror
  • Humor
  • Love Story
  • Magazines
  • Non Fiction
  • Poetry
  • Religion & Spirituality
  • Romance
  • Science Fiction
  • Self Help
  • Short Stories
  • Social Science
  • Stock Market
  • Travel
  • Vaastu
View All
Click to view categories for Marathi Books
  • अन्नपूर्णा
  • अनुवादित
  • आत्मचरित्र
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • उद्योग आणि अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • कथा
  • कविता
  • कादंबरी
  • चरित्र
  • ज्योतिषविषयक
  • नाटक
  • निवडक
  • प्रवास वर्णन
  • मासिक
  • राजकीय
  • व्यक्ती विकास
  • वास्तुशास्त्र
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान
  • विनोदी
  • शेअर बाजार
  • शेती विषयक
View All
Click to view categories for Kids Books
  • Action & Adventure
  • Ages 13-15
  • Ages 3-4
  • Ages 5-8
  • Ages 9-12
  • Alex Rider Series
  • Amar Chitra Katha
  • Archie
  • Asterix
  • Biography & Autobiography
  • Chhota Bheem Series
  • Comics
  • Encyclopedia
  • Enid Blyton
  • Fairy Tales
  • Famous Five Series
  • Fantasy & Magic
  • Fiction
  • Folk-Tales
  • Goosebumps
  • Grandpa & Grandma Stories
  • Hardy Boys
  • Horror
  • Magazine
  • Marathi
  • Mary-Kate And Ashley
  • Miscellaneous
  • Moral Stories
  • Mysteries & Detective
  • Nancy Drew
  • Non-Fiction
  • Panchatantra
  • Religious
  • Science Fiction
  • Short Stories
  • Teens
  • Tinkle
  • YPS Dictionary
  • YPS Encyclopedia
View All
Shubhmangal (शुभमंगल)
- Shubhmangal (शुभमंगल)
Reader Rating:
Pages:
141
Price:
220
Website:
Available Copies:
1
Total Copies:
2
Front Cover
Back Cover

< BACKNext > SHUBHMANGAL by B. D. KHER 0 Reviews facebook sharing buttontwitter sharing buttonpinterest sharing buttonwhatsapp sharing buttonlinkedin sharing buttonblogger sharing buttontelegram sharing buttonemail sharing button Previous Next* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately. Availability : Available ISBN : 9789394258877 Edition : 2 Pages : 144 Language : MARATHI Category : NOVEL Quantity 1 INR 220.00+ ADD TO CARTBuying Options: Print Books: Summary(English) Summary(Marathi) Awards Translation Adaptation Youtube ’शुभमंगल’ कथेतील सुनंदाच्या वडिलांचा चमत्कारिक स्वभाव तिला घर सोडून बाहेर पडण्यास भाग पाडतो. आपल्या मर्जीविरुद्ध लग्न करावे लागल्याचा राग ते इतक्या वर्षांनंतर मुलांवर, बायकोवर काढत असतात. त्यांना कुटुंबीयांची कोणतीच गोष्ट पटत नसते. त्यातच मुलीचे- सुनंदाचे लग्न आपल्या बॉसची मर्जी संपादन करण्यासाठी त्याच्या वाया गेलेल्या मुलाशी लावण्याचा प्रयत्न ते करतात, तेव्हा आईला दुःखात ठेवून सुनंदावर घर सोडण्याची वेळ येते. ती आपल्या आपल्या मैत्रिणीच्या आधाराने पायांवर उभी राहते. अशातच योगायोगाने तिची ओळख मुकुंदाशी होते. दोघांची मने एकमेकांशी जुळतात. पण त्याच सुमारास देशातील परिस्थिती बिघडते. सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे मतभेद होतात. संघ त्याविरुद्ध सत्याठाहाचे रणशिंग फुंकतो. त्यावर बंदी घातली जाते. यात मुकुंदाचे लक्ष तिकडे आकर्षिले जाते. देशप्रेमाने भारावलेला मुकुंद त्यात उडी घेतो. सुनंदाचे प्रेम मुकुंद स्वीकारतो का, त्यांचे शुभमंगल होते का, यासाठी वाचावी ’शुभमंगल’ कादंबरी या पुस्तकातील दुसरी कादंबरी ’प्रायश्चित’. यात समीरवर आपल्या विधवा आंधळ्या आईची व पोरक्या मामेबहिणीची जबाबदारी समीरवर असते. मामाने समीरचे वडील वारल्यावर त्या दोघांना आधार दिलेला असल्याने आता त्याच्या पश्चात त्याची मुलगी समीरच्या आधाराने राहत असते. त्यामुळे समीरच्या आईच्या मनात आपल्या भावाचे ऋण फेडण्यासाठी त्याच्या मुलीला- सरोजला आपली सून करून घ्यायचे असते. सरोजही मनाने समीरमध्ये गुंतलेली असते. परंतु दुकान तपासणीच्या निमित्ताने समीर कादरभाईच्या दुकानात 3-4 वेळा जातो, आणि त्याची पुतणी- शिरीनकडे आकर्षिला जातो. ती मुस्लिम असूनही सर्व धर्मांचा तिचा अभ्यास, त्यातील गांधीजी, विवेकानंद यांच्याविषयी तिला वाटणारा आदर अशा गोष्टींनी तो प्रभावित होतो. तिला हिंदू धर्माचीही चांगली माहिती असते. आपला जोडीदार हिंदूच असावा, असा विचारही शिरीन त्याच्याकडे उघड करते. ती आपल्या काकाच्या आश्रयानेच राहत असते. ती समीरकडे ओढली जाते. समीरही शिरीनच्या प्रेमात पडतो. सरोज मनापासून त्याची चाहती आहे व आपल्या आईच्या पसंतीची आहे. शिरीन भेटण्यापूर्वी सरोज त्याला आवडत होती; पण आता शिरीनची त्याच्यावर जादू झाली आहे. पण शिरीन मुस्लिम असल्याने हे कसे जमायचे? सरोजला याची कुणकुण लागली आहे. अशातच एकदा शिरीन गायब होते. तिचा ठावाठिकाणाही त्याला लागत नाही. इकडे शिरीनच्या काकाने घात केला आहे. एका तोतया सरदाराला त्याने आपल्या पोरक्या पुतणीला पैशासाठी विकले आहे. त्या कोठडीतील जाफरभाईला तिची दया येते. त्याला तिच्याबद्दल आपलेपणा वाटतो. तो त्या नराधमाच्या तावडीतून तिला सोडविण्याचे ठरवतो. आपण येथे कसे आलो, हे सांगताना त्याने हिंदू-मुस्लिम झगड्याच्या वेळी आपल्या धर्मबांधवांच्या दबावाखाली हिंदू मित्राचा खून केल्याचे सांगतो. त्याबद्दल त्याला फार वाईट वाटत असते. त्यासाठी त्याला तुरुंगातही जावे लागते; मात्र पोलिसाच्या मदतीनेच तो तुरुंगातून पळ काढतो आणि आता या सरदाराच्या ताब्यात सापडतो. शिरीनच्या लक्षात येते, की समीरच्या वडलांचा खून करणारे हे आपले वडीलच आहेत. लहानपणी त्यांचे फोटो पाहिलेले ेतिच्या लक्षात येते. दोघे त्या तोतया सरदाराच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी होतात. शिरीनही आपल्या वडलांना आपली कहाणी व समीरबद्दल सांगते. दोघे समीरकडे येतात. समीर शिरीन व तिच्या वडलांच्या भेटीने आनंदित होतो. समीर शिरीनशी लग्न करतो, की सरोजला स्वीकारतो? ललितरम्य भाषा, चित्तथरारक मांडणी, कथानकाची आकर्षकता आणि वैशिष्ट्यपूर्ण स्वभावरेखन हे भा. द. खेर यांच्या कादंबर्यातून दिसणारे लेखनगुण या दोन्ही कादंबर्यांतून प्रकर्षाने प्रकट झालेले दिसतील.

Related Books




This book has no reviews yet. Be the first one to write a review