Felanee (फेलानी)
-
Felanee (फेलानी)
|
|
Price:
450
|
Front Cover
|
Back Cover
|
|
सत्यघटनांवर आधारित हे पुस्तक म्हणजे धाडसाची, वांशिक लढ्याची - हिंसेची आणि तग धरून जिवंत राहिल्याची कथा आहे. आतापर्यंतच्या आसाम मधील दोन मोठ्या आंदोलनांनी अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. यांचे राजकीय चित्रण या पुस्तकात आहे. आसामच्या लोकप्रिय कादंबरी लेखिकेने या पुस्तकात सत्ता स्पर्धेमध्ये दिसणारा मानवी जीवनाविषयीचा अनादर आणि अनास्था, सत्तेसाठी चाललेला किळसवाणा खेळ, त्यात सामील झालेल्यांचा ढोंगीपणा आणि वांशिक हिंसेची भयानकता यांचे कठोर आणि निर्भीड शब्दात चित्रण केलेले आहे. पुस्तकाची भाषा आणि एकामागोमाग येणाऱ्या घटना यामुळे श्वास रोखून वाचत जावे असे हे पुस्तक आहे.. फेलानी नावाच्या आसामी स्त्रीच्या अनुभवांभोवती हे कथानक गुंफलेले आहे. `फेलानी` या शब्दाचा अर्थ `फेकून दिलेली` असा आहे. कारण दंगलीमध्ये पेटलेल्या गावात तसेच टाकून फेलानेची आई निघून जाते. फ़ेलानेला दलदलीमध्ये फेकून दिले जाते. पण फेलाने आणि तिच्या सारखे हजारो अशाही परिस्थितीतून वाचतात. स्वतःचे मूळ हरवून बसलेली ही निरनिराळी माणसे रेफ्युजी कॅम्पस मध्ये एकत्र जगतात, आसामी नद्यांच्या खोऱ्यात एकत्र रुजतात, वाढतात. त्यांच्या या प्रवासाच्या कथा फेलानेच्या नजरेतून पुस्तकात सांगितल्या आहेत. राजकीय पार्श्वभूमीवर निर्माण झालेले हे सत्तेचे, संघर्षाचे, जिवंत राहून जगत राहिलेल्यांचे कथानक आहे.