Banking Pravas-Samajik Janivetun (बँकिंग प्रवास सामाजिक जाणिवेतून)
-
Banking Pravas-Samajik Janivetun (बँकिंग प्रवास सा
|
|
Price:
265
|
Front Cover
|
Back Cover
|
|
बँकेतल्या नोकरीकडे एक आरामदायी, अधिक पगार आणि प्रतिष्ठा देणारी नोकरी म्हणून पाहणारे अनेक जण असतात. ज्या वेळी बँकेतल्या नोकरीकडे केवळ नौकरी म्हणून पाहिले जाते, त्या वेळी हाती काहीच लागलेले नसते. सेवाकाळात मिळालेला पगार, बोनस आणि निवृत्तीच्या वेळी मिळणारे फंड, मॅच्युइटी हे इतकेच घेऊन मंडळी ज्येष्ठ नागरिक बनलेले असतात; परंतु काही मोजकेच लोक या नोकरीकडे दरमहाच्या पगार देणाऱ्या नोकरीपलीकडे बघतात आणि ही नोकरी म्हणजे समाजासाठी, समाजातल्या दुर्बलांसाठी काही करण्याची एक संधी आहे, असंही समजतात. ही मंडळी पगार तर मिळवतातच, तसेच अन्य नोकरीतले जे काही लाभ असतात, तेही प्राप्त करतात. त्याशिवाय त्यांनी प्रचंड मोठे समाधान मिळवलेले असते. आपण एका संस्थेच्या विकासात पूर्ण ताकदीनिशी आपला हातभार लावला आहे. याचे ते समाधान असते. आपण आपल्या अधिकाराचा सुयोग्य उपयोग सामाजिक हित सांभाळण्यासाठी केला आहे, याचे त्यांना समाधान असते. त्यांनी अनेक तरुणांना रोजगारप्रवण केलेले असते, अनेक उद्योगांना हातभार लावलेला असतो. हे सगळे प्रसंग, त्यातून मिळालेले समाधान याची मोजदाद कशातच करता येणार नाही.
आजही कुणीतरी चुणचुणीत, पण गरीब असा एखादा वसंत बँकेत आलेला आठवतो आणि आपल्या समोरच त्याचा उद्योग बहरलेला आपण पाहिलेला असतो. हे असे अनेक प्रसंग निवृत्तीनंतर एक आत्मिक समाधान देत असतात. नोकरी म्हणजे सामाजिक दायित्व निभावण्याची संधी आहे, असे समजून काम केलेल्या व्यवस्थापिका सौ. जान्हवी जोगळेकर यांचा सेवाकाळ म्हणून तर अत्यंत समाधानाचा ठरला आहे. सगळे प्रसंग आजही आनंद देणारे आहेत आणि आता नोकरीत असणाऱ्यांसाठी तो एक वस्तुपाठ आहे. आवर्जून वाचावे, असे हे स्मरणरंजन आहे.