Dabholkar-Pansare Hatya : Tapasatil Rahasye? (दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये?)
-
Dabholkar-Pansare Hatya : Tapasatil Rahasye? (दाभो
|
|
Price:
160
|
Front Cover
|
Back Cover
|
|
महाराष्ट्रातील चर्चेचा विषय बनलेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या संबंधी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित माहिती, आरोपपत्रे आणि न्यायालयाचे आदेश यांचे हे पुस्तक एक विस्तृत संशोधन आहे. या प्रकरणात दोन पक्ष आहेत. एक हत्या झालेल्या नास्तिकतावाद्यांचा आणि दुसरा हत्येचा आरोप झालेल्या संस्थांच्या सदस्यांचा. प्रस्तुत लेखकाने कोणत्याही पक्षाच्या बाजूने लेखन न करता संपूर्ण तपासाचे तटस्थपणे सत्यशोधन केले आहे. उभय प्रकरणातील तपास यंत्रणाचे पूर्ण अपयश आणि पोलिसांच्या तपासवरील राजकीय प्रभाव यांवर हे पुस्तक भाष्य करते. खरे आरोपी न पकडले गेल्यास सीबीआय सारखी सर्वोच्च तपाससंस्थाही कशा प्रकारे अन्यायकारक कृत्ये करते. हे पुस्तकातील उदाहरणांवरून लक्षात येते. या पुस्तकात लेखकाने भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात दोषींना शिक्षा देण्यासाठी आणि निरपराधांना संरक्षण देण्यासाठी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पोलीस दले आणि न्यायिक प्रक्रिया यांच्यात सुधारणा तातडीने व्हावी, यासाठी पाठपुरावा केला आहे.